विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकेकाळी मिस युनिव्हर्स राहिलेली, बॉलीवूड मधील प्रसिध्द अभिनेत्री सुष्मिता सेन ही ब्युटी विथ ब्रेन आहे. जेवढी ती बुद्धिमान आहे तितकीच ती सुंदरही आहे. ती बऱ्याच कारणांमुळे चर्चेत असते. पण मागील काही वर्षापासून ती चर्चेत होती ते म्हणजे हॉटस्टारवर झळकलेल्या तिच्या आर्या या सीरिजमुळे. नुकताच आर्या या सीरिजचा दुसरा सीझन देखील प्रदर्शित झाला आहे.
Breakup of Sushmita Sen and Rohman
आज तिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपला लाँग टर्म बॉयफ्रेंड रोहमन सोबत ब्रेकअप झाल्याचे जाहीर केले आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सर्वत्र होती. त्यानंतर एका पार्टीमध्ये हे दोघे एकत्र दिसले होते, त्यामुळे यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.
प्रवीण तरडेंच्या सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित, बाहुबली फेम प्रभासने केले कौतुक
आता सुष्मिताने स्वत:च आपल्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर करत आपल्या ब्रेकअपची बातमी दिली आहे. रोहमननं हीच पोस्ट शेअर करत ही बातमी कन्फर्म केली आहे. तो तिच्या पेक्षा 15 वर्षांनी लहान होता. बऱ्याच लोकांनी हे नाते फार काळ टिकणार नाही असे म्हटले होते. पण हे दोघे 4 वर्ष सोबत होते.
रडून, भांडण करून, एकमेकाला शिव्या घालूम वेगळे होणारे लोक तर आपण सर्वत्र पाहतच असतो. पण अतिशय समजूतदारपणे, एकमेकांचा आदर करून जे लोक वेगळे होतात ते नक्कीच बुद्धिमान असतात. त्यामुळे ब्रेकअप करणार्या कपल्ससाठी सुष्मिताची ही पोस्ट एक आदर्श पोस्ट म्हणून रेफर करता येऊ शकते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App