हैदराबादच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर, सरसंघचालकांकडूनदेखील उल्लेख भाग्यनगरच!


विशेष प्रतिनिधी

नागपूर : तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादच्या नामांतराचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय समन्वय बैठकीमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ५ ते ७ जानेवारी या कालावधीत ही बैठक हैदराबादला होणार आहे; परंतु संघातर्फे शहराचा नामोल्लेख भाग्यनगर असा करण्यात आला आहे.The issue of renaming of Hyderabad is on the agenda, even from Sarsanghchalak, Bhagyanagar!

संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीदेखील मी भाग्यनगरला गेलो होतो व जानेवारीतदेखील भाग्यनगरलाच जाणार असे म्हणत हैदराबाद असा नामोल्लेख करण्याचे टाळले.नागपूर : तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादच्या नामांतराचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय समन्वय बैठकीमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.५ ते ७ जानेवारी या कालावधीत ही बैठक हैदराबादला होणार आहे; परंतु संघातर्फे शहराचा नामोल्लेख भाग्यनगर असा करण्यात आला आहे. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीदेखील मी भाग्यनगरला गेलो होतो व जानेवारीतदेखील भाग्यनगरलाच जाणार असे म्हणत हैदराबाद असा नामोल्लेख करण्याचे टाळले.

२०१४ साली सत्तेत आल्यापासून भाजपशासित अनेक राज्यांतील शहरांची नावे बदलण्यात आली. भाजपच्या अनेक नेत्यांनी हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करू असे म्हटले होते. याला हैदराबादचे स्थानिक नेते तसेच एमआयएमकडून जोरदार विरोध करण्यात आला.

हा मुद्दा काहीसा मागे पडला असताना संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांच्या ट्विटमुळे परत चचेर्ला आला. संघातर्फे नियमितपणे विविध संघटनांची समन्वय बैठक घेण्यात येते. पुढील बैठक भाग्यनगर येथे होईल, असे नमूद केल्याने राष्ट्रीय पातळीवर यावर विविध प्रतिक्रिया समोर आल्या.

संघाच्या ट्विटमध्ये हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर असा करण्यात आला अस् आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक पुढील महिन्यात म्हणजे, 5 ते 7 जानेवारी 2022 या कालावधीत भाग्यनगर (हैदराबाद) येथे आयोजित करणार आहे.

ही अखिल भारतीय स्तरावरील सर्वसमावेशक समन्वय बैठक वषार्तून एकदा घेतली जाते. या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत , सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह संघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या शिवाय भारतीय मजदूर संघाचे हिरण्यमय पंड्या, बी. सुरेंद्रन, विश्व हिंदू परिषदेचे आलोक कुमार, मिलिंद परांदे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आशिष चौहान, श्रीमती निधी त्रिपाठी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा , बी. एल. संतोष, भारतीय किसान संघाचे दिनेश कुलकर्णी, रामकृष्ण राव, विद्या भारतीचे जी. एम. काशीपती, राष्ट्र सेविका समितीचे सुश्री अन्नदानम सिताक्का, रामचंद्र खराडी, वनवासी कल्याण आश्रमाचे अतुल जोग यांच्यासह 36 संस्थांचे अधिकारी सहभागी होणार

असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले. या बैठकीत पर्यावरण, कौटुंबिक प्रबोधन, सामाजिक समरसता या विषयांवर चर्चा होणार आहे. मात्र, या सगळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हैदराबादच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.

The issue of renaming of Hyderabad is on the agenda, even from Sarsanghchalak, Bhagyanagar!

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था