महिला सक्षमीकरण आणि स्वाभिमानाचे‌ उदाहरण, समंथा


नवी दिल्ली : काही सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समंथा व नागा चैतन्य घटस्फोट घेणार आहेत असे समजते. पण या घटस्फोटाचे वैशिष्ट्य हे आहे की, समंथाने तिला देऊ केलेली पोटगीची रक्कम तिही तब्बल २०० कोटी ₹ नाकारली आहे असे कळाले. २ ऑक्टोबर २०२१ रोजी या जोडीने आपण विभक्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत. नागा चैतन्य आणि त्याच्या कुटुंबीयांनी यासाठी समंथाला २००कोटी ₹ देऊ केले आहेत. समंथाने ही रक्कम घेण्यास नकार दिला आहे. ती एक स्वाभिमानी व स्वकर्तृत्वावर पुढे आलेली मुलगी आहे असे ती म्हणते.

Best example of Women empowerment, Samantha

त्यांच्या लग्नाला चार वर्षं झाली आहेत. परस्पर संमतीने ते घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार आहेत. पूर्ण विचारांती समंथाने ठरवले आहे की, ती पोटगी घेणार नाही तसेच नागा चैतन्य व कुटुंबियांकडून कोणतीही रक्कम घेणार नाही. तिने मोठ्या मेहनतीने टॉलीवुड मध्ये स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. आपला स्वाभिमान जपण्यासाठी ती या विवाहातूंन पैसे मिळवण्याचा विचारही करू शकत नाही. तिच्या जवळच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ती आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहे. ती या समस्येचा विचार करत बसू इच्छित नाही.

तिला या घटनेचा धक्का बसला असला तरी तिच्या खाजगी जीवनाचा ती आपल्या कामावर परिणाम होऊ देणार नाही. ती स्वतंत्र व प्रोफेशनल विचारांची आहे आणि आव्हानांना तोंड देण्याची तिची क्षमता आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या सोशल मिडियावरील नावातून Akkineni हे आपले आडनाव काढून टाकले होते व यातुनच त्यांच्यात काहीतरी बिनसले असल्याचे संकेत मिळाले. पण नागा चैतन्य व समंथाने या विषयावर काही विधाने केली नव्हती. याउलट असा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचा तिने तिरुपती येथे समाचार घेतला होता.

नागा चैतन्यचे वडिल नागार्जुन यांनी सांगितले की या दोघांमध्ये जे काही असेल ते खाजगी आणि दुर्देवी आहे. त्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्याबरोबरचे क्षण कायम स्मरणात राहतील असेही ते म्हणाले.

Best example of Women empowerment, Samantha

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात