विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर खान हिला नुकताच कोरोनाची लागण झाली होती. तिला कोरोणाची लागण होण्याआधी तिने बऱ्याच पार्ट्या अटेंड केल्या होत्या. करण जोहरच्या घरी बऱ्याच अभिनेत्री डिनरसाठी जमल्या होत्या. त्याआधी करीना एका बक्षीस वितरण समारंभामध्ये देखील हजर झाली होती. तिला कोरोनाची लागण झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी तिच्यावर टीका केली हाेती.
As soon as the corona report came negative, Kareena Kapoor arrived at the party, got trolled again
मुंबईच्या महापौर यांनी देखील तिच्यावर प्रचंड टीका केली होती. घरी दोन लहान मुलं असताना कशाला पार्टी करत फिरायचे? असे त्यांनी म्हटले होते. तर आता करीनाचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तिने पुन्हा पार्ट्या करण्यास सुरूवात केली आहे.
Kareena Kapoor : बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोराला कोरोनाची लागण, नुकतीच अनेक पार्ट्यांमध्ये लावली होती हजेरी
नुकताच ख्रिसमसच्या निमित्ताने कपूर फॅमिलीचे गेटुगेदर होते. तिथेही ती हजर होती. तर आपली बेस्ट फ्रेंड अमृता अरोरासोबत ती पुन्हा पार्टी अटेंड करताना दिसून आली. करीनाने आपल्या इंस्टाग्रामवर या पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे पुन्हा करीनाला ट्रोल केले जात आहे.
करिना आणि आमिर खान यांची प्रमुख भूमिका असणारा लाल सिंग चढा हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. 1994 साली प्रदर्शित झालेल्या फॉरेस्ट गम्प या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App