विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार अक्षय कुमारचा (Actor Akshay Kumar) बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ चित्रपट (Sooryavanshi Movie) लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये (Diwali 2021) धमाका करणार आहे. सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 5 नोव्हेंबर म्हणजे दिवाळीमध्ये सूर्यवंशी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होत. अखेर प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. Akshay Kumar’s ‘Suryavanshi’ to explode on Diwali; Release on November 5!
या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत अजय देवगण (Ajay Devgan) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचसोबत बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या तिन्ही अभिनेत्यांनी सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ पोस्ट करत चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंग एका थिएटरमध्ये पाहायला मिळत आहेत. पण थिएटरमधील सर्व खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत.
Interval hua khatam, now it’s showtime! #Sooryavanshi releasing this Diwali, 5th November at a cinema near you. Come celebrate with us. #BackToCinemas pic.twitter.com/JF2QE80Efp — Akshay Kumar (@akshaykumar) October 15, 2021
Interval hua khatam, now it’s showtime! #Sooryavanshi releasing this Diwali, 5th November at a cinema near you. Come celebrate with us. #BackToCinemas pic.twitter.com/JF2QE80Efp
— Akshay Kumar (@akshaykumar) October 15, 2021
या व्हिडिओमध्ये या तिन्ही कलाकारांनी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी असे सांगितले आहे की, चित्रपटांप्रमाणे आपल्या आयुष्यात देखील मध्यांतर येईल याचा कुणी विचार केला नव्हता. पण रात्रीनंतर आशादायी पहाट उगवेलच. त्यामुळे आाम्ही पुन्हा येतोय. थिएटरमध्ये पुन्हा टाळ्या, शिट्ट्यांचे आवाज ऐकू येतील. कारण या दिवाळीला सूर्यवंशी येतोय. सहकुटुंब थिएटरमध्ये या आणि आमच्यासोबत दिवाळी साजरी करा.’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App