विशेष प्रतिनिधी
दिल्ली : अभिनेत्री कंगना राणावतला नुकताच पद्मश्री हा अवॉर्ड मिळाला आहे. त्यानिमित्त तीने आपले मनोगत आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ द्वारे शेअर केले आहे. त्यामध्ये ती म्हणतेय, अगदी लहान वयामध्ये मी इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरूवात केली. सुरुवातीच्या 8-10 वर्षांमध्ये मला अजिबात यश मिळाले नाही. पण जेव्हा मला यश मिळाले. त्या नंतर बऱ्याच फेअरनेस ब्रँडच्या जाहिराती करण्यास मी नकार दिला. मोठमोठ्या बॅनरसोबत काम करण्यास नकार दिला. स्वतःचा रस्ता स्वतः बनवला.
Actress Kangana Ranaut honored with Padma Shri Award! Kangana says, many people will get the answer now, I am an ideal Indian citizen
‘आपल्या टॅलेंटच्या जोरावर यश मिळवले आहे. नेहमीच आणि वेळोवेळी मी भारतातील सामाजिक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करत असते. यावर मला बरेच ट्रोल देखील केले जाते. काही लोक मला विचारतात की, तू सर्व हे का करतेस? पण त्याचं उत्तर आज माझ्याकडे आहे. एक आदर्श नागरिक, एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून मी माझे मत वेळोवेळी व्यक्त करते. त्यासाठी मला हा भारतातील सर्वाेच्च अवॉर्ड मिळाला आहे. जे लोक मला प्रश्न विचारतात त्या लोकांना त्यांचे उत्तर मिळाले असेल. असे कंगना रणौतने आपल्या मनोगतामध्ये म्हटले आहे.
कंगना राणावत अंदमानच्या सेल्यूलर जेलच्या सावरकर कोठडीत नतमस्तक
अभिनेत्री कंगना राणावत सोबतच निर्माती एकता कपूर आणि सिंगर अदनान सामी यांनादेखील पद्मश्री अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App