विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाठग सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात बॉलीवूडमधील अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अडकली. तिच्या पाठोपाठ नोरा फतेही देखील ईडी चौकशीच्या जाळ्यात अडकली. सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या वस्तू भेट म्हणून दिलेल्या होत्या. तसेच तिच्या आईला, बहिणीला, भावालादेखील अनेक पैसे दिलेले होते.
Actress Jacqueline Fernandez in the lead role, Sukesh had promised Jacqueline to make a woman superhero movie at a cost of Rs 500 crore
महागडे कानातले, ब्रेसलेट, ब्रँडेड कपडे, महागडा घोडा,।महागडे मांजर, महागड्या गाड्या हे सर्व सुकेशने जॅकीला दिले होते. पण आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे कळतेय की, सुकेशने जॅकलिनला आणखी एक वचन दिले होते. ते म्हणजे आपण 500 कोटी फिल्म प्रॉडक्शनसाठी इन्व्हेस्ट करणार आहोत असे त्याने तिला सांगितले होते.
सुकेश चंद्रशेखर म्हणतो, जॅकलिन खोटे बोलतेय
वुमन सुपरहिरोच्या सिरिजमध्ये जॅकलीनला मुख्य अभिनेत्री म्हणून घेतले जाईल, असे देखील त्याने सांगितले होते. हे सर्व करण्यासाठी आधी त्याने जॅकलिनचा, बॉलीवूडचा खूप रिसर्च केला होता. आणि हा महा प्रोजेक्ट बनवण्यासाठी हॉलीवूडमधील आर्टिस्ट देखील काम करणार असल्याचे त्याने तिला सांगितले होते.
या सर्व गोष्टींमुळे जॅकलिनला सुकेशवर विश्वास बसला. 500 कोटी रुपये खर्चून एक वुमन सुपार हिरो सिनेमा बनणार आणि त्यात आपण अभिनेत्री असणार या मोहापायी ती त्याच्या जाळ्यात अडकली असे आता सांगण्यात येतेय.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App