जॉन अब्राहमने सोमवारी सकाळी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिली आहे. Actor John Abraham and his wife Priya also corona positive
विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. मोठ मोठ्या नेत्यांसह सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीज कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत. दरम्यान, आता बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. जॉन अब्राहमने सोमवारी सकाळी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिली आहे.
“प्रिया आणि मी कोविड पॉझिटिव्ह आलो आहोत. तसेच, आम्ही स्वतःला घरी क्वारंटाइन केले असून आता आम्ही कोणाच्या संपर्कात नाही. आमचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. आम्हाला सौम्य लक्षणे आढळली आहेत. कृपया स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी रहा.”मास्क जरूर घाला. असे आवाहनदेखील त्याने केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App