विशेष प्रतिनिधी
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीमधील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. निखिल द्विवेदी हे एक अॅक्टर, प्रोड्यूसर आहेत. यांनी नुकताच लेखक गौतम चिंतामणी यांनी लिहिलेले ‘डार्क स्टार : द लोन्लीनेस ऑफ बिग राजेश खन्ना’ या पुस्तकाचे अधिकार विकत घेतले आहेत आणि लवकरच या पुस्तकावर आधारित चित्रपट बनवण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भात त्यांनी दिग्दर्शिका फराह खान हिच्यासोबत देखील चर्चा केलेली आहे.
A film based on the life of Rajesh Khanna, known as the first superstar in Bollywood, will be released soon
Bollywood ला खानदानी stars हवेत; कलाकार नकोत…!!
याबद्दल सांगताना निखिल म्हणतात की, राजेश खन्ना हे भारतीय चित्रपटसृष्टीला मिळालेले असे कलाकार आहेत ज्यांनी वर्षांनुवष्रे भारतीय चित्रपटसृष्टीवर राज्य केले हाेते. जरी त्यांना अभिनेता व्हायचे नव्हते तरीदेखील त्यांनी या अभिनय क्षेत्रावर राज्य केलेले होते. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये बऱ्याच अपयशाचा देखील सामना करावा लागला होता. पण नेहमी ते एक उत्कृष्ट कलाकार कलाकार म्हणून उभे राहिले आणि सर्वांवर मात केली होती. अशा दिग्गज कलाकारावर चित्रपट बनवणे हे अतिशय महान काम असणार आहे. आणि म्हणूनच यासंबंधी मी फराह खान हिच्यासोबत चर्चा केलेली आहे. असे देखील त्यांनी सांगितले.
फराह खानने याबाबत आपले मत मांडताना म्हटले आहे की, गौतम यांनी लिहिलेले पुस्तक मी वाचले आहे आणि हे मला अतिशय फॅसिनेटिंग वाटत आहे. त्यामुळे आम्ही लवकरच चर्चा करून यावर काम करण्यास सुरूवात करू.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App