वृत्तसंस्था
नवी दिल्ली : चीनी व्हायरसमुळे जगातील सर्वच देशांत भारतीय अडकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयाला सुखरुपपणे आणण्याचा प्रण केला आहे. त्यासाठी वंदे भारत मिशन राबविण्यात आले होते. त्यातून हजारो भारतीय मायदेशात आले आहेत. आता दुसºया टप्याची सुरूवात झाली असून १४९ विमाने उड्डाणासाठी तयार आहेत.
वंदे भारत मिशनच्या पहिल्या टप्याची सुरूवात ७ ते १४ मेच्या दरम्यान झाली. यामध्ये १२ देशांतील १५ हजार भारतीयांना परत आणण्यात आले. आता दुसर्या टप्यात ३१ देशांतून भारतीयांना परत आणण्यात येणार आहे. अमेरिका, सुंयक्त अरब अमिरात, कॅनडा, सौदी अरेबिया, इंग्लंड, मलेशिया, ओमान, कजाकिस्थान, आॅस्ट्रेलिया, युक्रेन ,कतार आणि इंडोनेशिया या देशांचा यामध्ये समावेश आहे.
जगभरात चीनी व्हायरसमुळे हाहाकार माजल्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक देशांत वाहतुकीवर निर्बंध आणले होते. त्यामुळे विविध देशांत अनेक भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी नागरी उड्डयन मंत्रालयाने ‘वंदे भारत’ मोहीम सुरू केली आहे. एअर इंडिया आणि त्याची सहाय्यक एअर इंडिया एक्सप्रेस ‘वंदे भारत’ अभियानाअंतर्गत या मोहीमेत सहभागी झाली आहे.
अमेरिका तसेच इतर देशात मोठ्या संख्येने अडकून पडेल्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यांचे पालक हवालदील झाले होते. मात्र, पंतप्रधानांनी सर्वांना दिलासा दिला होता. त्याप्रमाणे अमेरिकेत भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतांनी मायदेशी परतण्याच्या विचारात असलेल्या भारतीयांच्या याद्या तयार करण्यास सुरवात केली. आॅनलाईन नोंदणीद्वारे या याद्या तयार केल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांना परत येणे सुलभ होऊ लागले आहे.
Array