ममतादीदी, कोरोनाशी मुकाबला करताना तुम्ही नापास झाल्या आहात…!! ; राज्यपाल जगदीप धनकर यांचे खरमरीत पत्र


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : “मुख्यमंत्री ममता बँनर्जी या कोरोनाचा मुकाबला करताना नापास झाल्या आहेत. त्यांची सर्व वर्तणूक या अपयशापासून लोकांचे लक्ष दूर हटविण्यावर केंद्रीत झाली आहे. त्या स्वत:ला कायद्याच्याही वर समजायला लागल्या आहेत. पण राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून मला त्यांना काही मुद्दे सुनवावे लागत आहेत,” अशा कडक शब्दांत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी सहा पानी पत्र मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांना पाठविले आहे. राज्यपाल – मुख्यमंत्री यांच्यातील घटनात्मक संबंधांवरही या पत्रात प्रकाश टाकण्यात आला आहे.


या पत्रातील काही मुद्दे असे :

  •  राज्यातील जनता कोरोनाचा धैर्याने तोंड देत असताना राज्याचा प्रथम नागरिक म्हणून आपल्या बरोबरीने त्याच्या विरोधातील लढाईत उतरण्याची माझी इच्छा आहे… पण…
  •  गेल्या काही दिवसांमधील आपली वर्तणूक पाहिली की असे वाटते की आपण कोरोनाचा मुकाबला करण्यात अपयशी ठरला आहात. या अपयशावरून लोकांचे लक्ष दूर जावे म्हणून वेगळ्याच प्रकारचे हातखंडे आपण अजमावत आहात.
  •  राज्यात अल्पसंख्याकवादाला खतपाणी घालत आहात. आपले अल्पसंख्याकांचे लांगूलचालन एवढ्या खालच्या थराला पोहोचले आहे की निजामुद्दीन मरकजसंबंधीचा प्रश्न पत्रकाराने विचारणेसुद्धा आपल्याला खटकले. मला असले जातीय प्रश्न विचारू नका, असे आपण पत्रकारालाच सुनावले. पण म्हणून सत्य लपून राहिले नाही.
  •  गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनासंबंधीची माहिती दडविण्याचे काम वेगवेगळ्या पातळ्यांवर होतेय. आपणच अशी माहिती दडविली तर आपल्यालाच वास्तव कसे समजणार? आणि आपण कोरोनाचा परिणामकारक मुकाबला तरी कसा करू शकणार आहोत, याचा कृपया आपण विचार करा.
  •  कोरोनाची माहिती बाहेर येऊ नये म्हणून आपण हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डात मोबाईल बंदी घातलीत. असल्या उपायांनी माहिती बाहेर यायचे थांबणार आहे का? किती दिवस अशी माहिती दडवून आणि दडपून आपण वस्तुस्थितीकडे डोळेझाक करू शकाल? आपले अपयश त्यामुळे झाकले जाईल, असे आपल्याला वाटतेच कसे? एक दिवस सत्य बाहेर येईलच ना!! म्हणून आपण विचार करा. ही वेळ एकत्र येऊन कोरोनाचा मुकाबला करण्याची आहे.
  •  कोरोनाग्रस्त भागाचा दौरा करण्यास केंद्रीय समिती आली होती. त्यांच्या पाहणीत अडथळा आणण्यात आला. ती समिती पाहणीद्वारे राज्याला मदतच करायला आली होती ना!! मग त्यांना माहितीही नीट देण्यात आली नाही. या समितीचे राज्याबद्दलचे काय मत तयार झाले असणार? याचा आपणच विचार करा.
  •  पश्चिम बंगालच्या हिताचा कोणताही विषय जगदीप धनकर आणि ममता बँनर्जी या दोन व्यक्तींमधल्या संबंधांचा नाही. तो आहे, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या संबंधांचा आणि कर्तव्याचा. मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांशी समन्वय ठेवून काम करणे हे आपले घटनात्मक कर्तव्य आहे. आणि राज्यात घटनेचे पालन आणि रक्षण करणे हे माझे घटनात्मक कर्तव्य आहे. या पूर्वी देखील मी या तत्त्वाची जाणीव आपल्याला करवून दिली होती पण आपली वर्तणूक मला त्या अनुसार आढळली नाही म्हणून मी पुन्हा एकदा आपणास वरील घटनात्मक कर्तव्याची जाणीव करवून देत आहे.
  •  मला असे वाटते, आपण घटनात्मक कर्तव्य पार पाडण्यास बांधले गेलो आहोत. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. अगदी स्वत:ला समजत असला तरी…!! कायदा सर्वांना बंधनकारक आहे.
  •  ही वेळ राजकारण करण्याची नाही. राज्याला घटनात्मकदृ्ष्ट्या उच्च परंपरा, पायंडे आहेत. आता डॉ. बिधनचंद्र रॉय असते तर त्यांची वर्तणूक कशी असती, हे आठवा, विचार करा आणि त्याचे पालन करा…!!

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात