गोवाही म्हणतेय, महाराष्ट्रातल्या लोकांना प्रवेश नको


पर्यटनाचे केंद्र असलेल्या छोट्याशा गोवा राज्याने चीनी व्हायरसवर पूर्ण नियंत्रण मिळविले आहे. मात्र, आता गोव्याला महाराष्ट्रातून येणाऱ्यांची धास्ती वाटत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना राज्यात प्रवेश देऊ नका अशी मागणी गोव्याचे एक मंत्री मायकल लोबो यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : पर्यटनाचे केंद्र असलेल्या छोट्याशा गोवा राज्याने चीनी व्हायरसवर पूर्ण नियंत्रण मिळविले आहे. मात्र, आता गोव्याला महाराष्ट्रातून येणाऱ्यांची धास्ती वाटत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना राज्यात प्रवेश देऊ नका अशी मागणी गोव्याचे एक मंत्री मायकल लोबो यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांना चीनी व्हायरसचे गांभिर्य सुरूवातीला लक्षात आले नव्हते. परंतु, गोव्यासारख्या तुलनेने छोट्या राज्यांनी लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यापासून प्रादूर्भाव वाढणार नाही याची काळजी घेतली होती. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा ग्रीन झोनमध्ये गेल्याचंही जाहीर केले होते.

गोवा याआधी ग्रीन झोनमध्ये होते, संपूर्ण राज्याचा विचार केला तर आम्ही अजुनही ग्रीन झोनमध्येच आहोत. गेल्या काही दिवसांत दोन-तीन लोकं दिल्लीवरुन राज्यात आली होती, त्यांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. सध्या राज्यात जे बाधित रुग्ण सापडत आहेत, त्यातील बहुतांश हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील लोकांना राज्यात प्रवेश देऊ नका अशी मागणी केली आहे, असे लोबो यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील लोकांवर बंदी घाला म्हणजे मी येथील लोकांविरोधात नाही. परंतु, सध्या सर्वात जास्त बाधित रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. त्यामुळे पुढील काही कालावधीसाठी ही बंदी घालण्यात यावी. रस्ते, रेल्वे किंवा हवाई मार्गाने कोणत्याच प्रकारे महाराष्ट्रातील व्यक्तीला गोव्यात काही दिवसांसाठी प्रवेश नाकारला पाहिजे, असे लोबो यांनी सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात