पुलवामामध्ये गेल्या वर्षी घडविला त्याप्रमाणेच भीषण हल्ला घडविण्याची दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनची योजना होती. हल्ला घडविण्यासाठी वापरण्यात आलेली मोटार हिजबुलचा कट्टर दहशतवादी हिदायतुल्ला मलिक याची असल्याचे उघड झाले आहे.
वृत्तसंस्था
श्रीनगर: पुलवामामध्ये गेल्या वर्षी घडविला त्याप्रमाणेच भीषण हल्ला घडविण्याची दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनची योजना होती. हल्ला घडविण्यासाठी वापरण्यात आलेली मोटार हिजबुलचा कट्टर दहशतवादी हिदायतुल्ला मलिक याची असल्याचे उघड झाले आहे.
गेल्या वर्षी काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. यामध्ये ४४ जवान शहीद झाले होते. त्याच प्रकारचा हल्ला घडविण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र, सुरक्षा दलांच्या सतर्कतेने हा प्रकार हाणून पाडण्यात आला. यासाठी वापरलेली मोटार हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी हिदायतुल्ला मलिक याची होती.
पोलिसांनी या प्रकरणी हिदायतुल्लाचा भाऊ समीर मलिक याला शोपियान जिल्ह्यातून अटक केलीय. समीर मलिकची चौकशी करण्यात येत आहे.
दहशतवादी हिदायतुल्ला मलिक याचा भाऊ समीर मलिक याने काश्मीर खोऱ्यातून स्फोटकं आणली होती. ही स्फोटकं कशी मिळवली आणि त्याचा उपयोग कशासाठी करण्यात येणार होता, याची चौकशी सुरू आहे. दहशतवादी हिदायतुल्ला हा मूळचा शोपियानमधील शारतपोरा इथला आहे. गेल्या वर्षीच तो दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. दक्षिण काश्मीरमध्ये तो हिजबुलचा नेटर्वक तयार करत होता. तो पोलिसांच्या वॉन्टेड लिस्टमध्ये आहे.
पाकिस्तानच्या रावळपिंडीमधील जीशान पाशा हा या कटात सामील असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. यासह आदिल नावाचा एक वाहन चालक आणि कुलगाममधील वलीद नावाची व्यक्तीही या कटात सामील असल्याचा संशय आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App