तेलिनीपाडा हिंसाचारातून ममतांचे भयानक मनसूबे उघड

विशेष प्रतिनिधी

कोलकाता

 • पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील तेलिनीपाडा येथील हिंसाचारातून ममतांचे भयानक मनसूबे उघड व्हायला लागले आहेत.
 • भाजपचे स्थानिक नेते ते केंद्रीय मंत्री सगळेच ममतांवर शरसंधान साधताहेत म्हणून नव्हे तर बंगालमधील वास्तव वेगळीच कहाणी सांगते आहे याकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
 • बंगालमध्ये काश्मिरी अलगतावादी घटक, रोहिंग्या आणि बांगलादेशी यांच्या कारवाया वाढत असल्याचे केंद्रीय एजन्सीचे रिपोर्ट आहेत. एवढेच नाही तर बांगलादेश सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये काश्मिरी अलगतावादी – रोहिंग्या – बांगलादेशी यांची साखळी मजबूत होताना दिसते आहे. मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिजनापूर जिल्ह्यातील ही स्थिती आहे. तेथे मुस्लिम बहुसंख्याक तरी आहेत किंवा हिंदूंच्या बरोबरीने त्यांची संख्या आहे.
 • पश्चिम बंगालमधील एकूण ३८ हजार गावांपैकी ८ हजार गावे अशी आहेत, जेथे एकही हिंदू राहात नाही. या गावांतून हिंदूंना गेल्या १० वर्षांमध्ये मुस्लिमांनी हाकलून दिले आहे किंवा गाव सोडायला भाग पाडले आहे.
 • बंगालमधील मुस्लिमांची हिंदू विरोधी मानसिकता पोसून आपली वोटबँक पक्की करत राहायचा उद्योग ममता सातत्याने करत आहेत. राज्याच्या पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांची रचनाच अशी करण्यात आली आहे की ती हिंदू विरोधी मानसिकतेला प्रोत्साहन देत राहील.
 • हुगळी जिल्ह्याचे पोलिस प्रमुख हुमाँयू कबीर यांनी तेलिनीपाडा हिंसाचाराबद्दल १२९ जणांना अटक केली यात बहुसंख्या हिंदू आहेत. घरे हिंदूंची जाळली गेली आहेत. हिंदूंनी त्याचा प्रतिकार केला आहे. आणि तेच अटकेत आहेत.
 • तलवारी, धारदार शस्त्रे परजत मुस्लिम समूदाय निघाला आहे. सॉकेट बाँबचा वापर होतोय. याचे विडिओ व्हायरल होत आहेत. पोलिसांची या पुराव्यांकडे डोळेझाक आहे.
 • तेलिनीपाडा हिंसाचाराची तुलना अनेकांनी महमंद अली जिना आणि सुऱ्हावर्दी यांच्या direct action शी केली आहे. आधीच्या हिंसाचाराला “हिंदू – मुस्लिम दंगल” किंवा “दोन गटांमधील दंगल” असे संबोधले जात होते. पण तेलिनीपाडा हिंसाचाराची तुलना direct action शी होत असेल तर परिस्थिती किती भयानक आहे, याचा कल्पनेने अंदाज बांधण्याची गरज नाही. भवितव्य भीषण दिसते आहे.

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*