मुख्यमंत्र्यांचा सेफ गेम; विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार


  • मुख्यमंत्र्यांच्या नथीतून राष्ट्रवादीचा काँग्रेसवर बाण

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर सेफ गेम खेळला. विधान परिषद निवडणुकीत आपल्यावरच “गेम” पडू नये यासाठी उद्धव ठाकरे यांना काँग्रेसला धमकीवजा इशारा द्यावा लागला. यात काँग्रेसला माघार घेऊन एकच उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात ठेवावा लागला.

वास्तविक विधान परिषदेची एक जागा काँग्रेसला जास्त देण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने दिले होते. या आश्वासनाला अनुसरून त्यांनी आपला एक उमेदवार कमी करून काँग्रेसला संधी द्यायला हवी होती. पण नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची रणनीती आडवी आली.

मुख्यमंत्र्यांच्या निवडणुकीचे निमित्त करून राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने उद्धव ठाकरे यांच्या नथीतून तीर मारून काँग्रेसला माघार घ्यायला लावली. इथे शिवसेनेचा लाभ झाला. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने राजकीय मजा घेतली काँग्रेसला मात्र “त्याग” करावा लागला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मध्यंतरी फोन झाला होता, आजच्या घडामोडींना त्या फोन पे चर्चेची देखील वेगळी किनार आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण