विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना प्रवेशानंतर बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, की मी जन्माने आणि कर्माने हिंदू आहे. हिंदू धर्म हा अत्यंत सहिष्णू आहे. त्यामुळे सॉफ्ट हिंदुत्व अशी काही संकल्पना नाही. हिंदू धर्म हा प्रत्येकाला सामावून घेणारा धर्म आहे. मी सुद्धा महाविद्यालयात असताना तत्त्वज्ञान हा विषय घेतला होता. हिंदुत्व या विषयावर मला बोलायला नक्की आवडेल. मात्र, आजच मी त्यावर फार बोलणार नाही असेही उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले. urmila matondkar latest news
शिवसेनेत प्रवेश केल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, की सेक्युलर या शब्दाचा अर्थ इतर धर्मांचा द्वेष करणे असा होत नाही. मी जन्माने हिंदू आहे आणि कर्मानेही हिंदू. आठ वर्षांची असतानाच योगा केला आहे. माझा हिंदू धर्माचा अभ्यास आहे. पण सध्या सारखे धर्म सेक्युलॅरिझम एवढं चाललेय पण आधी माणूस म्हणून काही आपण बघणार आहोत की नाही. आपण देशाचा प्रदेशाचा विचार करणार आहोत की नाही. उत्तर मुंबईतून लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवार असताना उर्मिला मातोंडकर यांची भाषणे सेक्युलर विचारांचा पाठ पढवणारी होती. शिवसेनेत आल्याबरोबर त्यांनी हिंदुत्वाचा आणि हिंदु धर्माचा पाठ वाचायला सुरवात केली. urmila matondkar latest news
खरे तर या सर्व गोष्टींवर बोलण्याची मला आतापर्यंत गरज वाटली नाही. कारण मला असे वाटत आपला जो धर्म असतो, तो देव जसा मंदिराच्या गाभाऱ्यात असतो. तसाच आपला धर्म जिव्हाळ्याचा, आस्थेचा विषय असतो. त्यामुळे दरवेळी वेशीवर उभे राहून उहापोह करून वापरण्याची मला आतापर्यंत गरज वाटली नाही. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकर यांनी हे भाष्य केले आहे.
मी शिवसेनेत लोकांची कामे करण्यासाठी आले आहे. शिवसेनेच्या प्रत्येक वाटचालीत मला त्यांची साथ द्यायला आवडेल. उद्धव ठाकरे यांनी खूप चांगले काम केले आहे. मागील वर्षभरात कोरोनाचे संकट येऊनही हे महाविकास आघाडीचे सरकार डगमगले नाही. कोरोनाचे संकट, नैसर्गिक आपत्ती यांचा योग्य पद्धतीने सामना या सरकारने केला आहे असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेत मी शिवसैनिक म्हणूनच काम करणार आहे असेही उर्मिला मातोंडकर यांनी स्पष्ट केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App