वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाचे संकट, शेतकरी आंदोलन याच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशासाठी आणि केंद्रातील मोदी सरकारसाठी रोजगाराच्या मुद्द्यावर सकारात्मक बातमी आली आहे. बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणावर घटून तो नोव्हेंबर अखेरीस 6.51% पर्यंत खाली आला आहे. जूनमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 10.18% होते. unemployment rate
नोव्हेंबर महिन्यामध्ये देशातील बेरोजगारीचा दर घटल्याची आकडेवारी समोर आली आहे. संकटकाळात मोदी सरकारसाठी हे मोठे यश मानले जात आहे. कोरोना संकटाक रोजगाराचे आकडे मोठ्या प्रमाणावर घटले. देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला होता. आर्थिक वाढीचा दर प्रचंड घसरेल, अशी आंतरराष्ट्रीय रेटिंग संस्थांनी भाकिते व्यक्त केली होती. परंतु नोव्हेंबर अखेरच्या तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काहीशी सकारात्मक आकडेवारी समोर आली. आर्थिक वाढीच्या आकड्याची घसरण रोखली गेल्याचे स्पष्ट झाले. कारण अर्थव्यवस्थेला सर्व पातळ्यांवर चालना देणारी पावले टाकली गेली. unemployment-rate
आता रोजगारीच्या आकडेवारीत देखील सकारात्मक वाटचाल दिसते आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावर विरोधक मोदी सरकारला घेरत होतेच पण आकडेवारीही चिंताजनक होती. पण नुकत्याच समोर आलेली आकडेवारीनुसार, देशात बेरोजगारीचे प्रमाण कमी झाल्याचे समोर येत आहे. unemployment-rate
कोरोना काळात जूनमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 10.18% होते, ते आता नोव्हेंबरमध्ये 6.51% पर्यंत खाली आले आहे. याआधी सप्टेंबर 2018 मध्ये बेरोजगारीचा आकडा 6.47 % होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) ने आकडेवारी जाहीर केली आहे. कोरोना महामारीमुळे एप्रिलमध्ये बेरोजगारीचा दर तब्बल 23.52 % च्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. 2020 मध्ये तर ही आकडेवारी सर्वाधिक होती. यानंतर कृषी क्षेत्रात झालेल्या सुधारणेमुळे सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊ लागल्याचे दिसले.unemployment-rate
भारतात ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर 6.98% आणि सप्टेंबरमध्ये 6.67% होता. देशातील ग्रामीण बेरोजगारीच्या दराविषयी सीएमआयईने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये हा दर 6.90% टक्के होता तर नोव्हेंबरमध्ये 6.26% वर घसरला आहे. देशभरातील आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये हरियाणात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 25.6% होते. यानंतर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर बेरोजगारीचा दर 18.6% होते. यानंतर गोवा 15.9 %, त्यानंतर हिमाचल प्रदेश 13.8 %, त्रिपुरा 13.1 %, पश्चिम बंगाल 11.2 % आणि बिहार बेरोजगारी दर 10% होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more