विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तथाकथित अघोषित आणीबाणीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकमेकांना भिडले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या अनुक्रमे राज्य आणि केंद्र सरकारवर आणीबाणीच्या मुद्द्यावर टीकेची झोड उठविली. uddhav tackeray – devendra fadanvis targets
मात्र, या प्रकारात मूळात ज्या पक्षाने खरी आणीबाणी लादली त्या पक्षाचे नेते मात्र सत्तेच्या वळचणीला बसून वर्षभरापूर्वीच्या या दोन मित्र पक्षांची भिंडत एन्जॉय करताना दिसत आहेत. भाजप ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे असे वातावरण असल्याचा आरोप केला. uddhav tackeray – devendra fadanvis targets
सरकारच्या विरोधात बोलले की तुरुंगात टाकताहेत. कुठल्या तरी प्रकरणात अडकवताहेत अर्णब गोस्वामी आणि कंगना यांच्या प्रकरणात खरेतर ठाकरे – पवार सरकारला चपराक बसली आहे. तरीही महाराष्ट्रात कुणीही काहीही सरकारच्या विरोधात बोलले की त्याला कुठल्या तरी केसमध्ये अडकवायचे असे प्रकार सुरू आहेत, असा आरोप केला. फडणवीसांनी ठाकरे – पवार सरकारच्या अनेक अपयशांवर बोटे ठेवली. परंतु, त्यांचा मुख्य आरोप राज्यात अघोषित आणीबाणी असल्याचा होता.
त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चहापानाच्या वेळी प्रत्युत्तर दिले. थंडी वाऱ्यात दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलन करताहेत. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले जाताहेत. मग देशातही आणीबाणी लागू आहे का, असा प्रतिप्रश्न ठाकरे यांनी विचारला.
विरोधकांचे मागचे वर्ष सरकार कधी पडेल? याचे मुहूर्त शोधण्यात गेले. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? दिल्लीत भर थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत. ही काय सद्भावनेची गोष्ट आहे का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. राज्य सरकारविषयी जनतेमध्ये कोणतीही नाराजी नाही, असा दावाही त्यांनी केला. पण त्यांचे मुख्य प्रत्युत्तर आणीबाणीच्या मुद्द्यावर होते.
वर्षभरापूर्वीचेच हे दोन सहकारी पक्षांचे नेते आणीबाणीच्या मुद्द्यावर एकमेकांना भिडत असताना मूळ आणीबाणी ज्यांनी लादली त्या पक्षाचे नेते महाराष्ट्रातल्या सत्तेच्या वळचणीला बसून ही “भिडंत” एन्ज़ॉय करताना दिसले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App