मी तर फकीर, धमक्या कुणाला देता? चंद्रकांतदादांनी विश्वजीत कदमांना सुनावले


ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्यानंतर आता राज्य मंत्री विश्वजीत कदम यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांंत पाटील यांची जुंपली आहे. मी एका गिरणी कामगाराचा मुलगा असून फकीर आहोत. काचेच्या घराच्या धमक्या कुणाला देता? अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी कदमांना फटकारले आहे.


विशेष प्रतिनिधी

सांगली : ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्यानंतर आता राज्य मंत्री विश्वजीत कदम यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांंत पाटील यांची जुंपली आहे. मी एका गिरणी कामगाराचा मुलगा असून फकीर आहोत. काचेच्या घराच्या धमक्या कुणाला देता? अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी कदमांना फटकारले आहे.

चीनी व्हायरसमुळे निर्माण झालेल्या संकटकाळात भंडारा जिल्ह्यातील नागरिकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कदम यांची पालकमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे. पाटील म्हणाले, ‘आपण फकीर आहोत. आपल्यावर टीका-टिप्पणी करण्यापूर्वी विश्वजीत कदम यांनी आपल्या अमाप साम्राज्याची काळजी करावी. सांगलीत पूर आला, त्यावेळी आपण काय केले? असा सवाल त्यांनी केला. मुळात आता संपूर्ण देश आणि राज्य महाभयानक संकटाचा सामना करत असताना, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले विश्वजीत कदम सांगलीत काय करत आहेत, यांचे त्यांनी उत्तर द्यावे.

भाजप सत्तेत नसूनही जनतेच्या मदतीला धावून गेला आहे. पक्षातर्फे राज्यातील ४६ लाख लोकांच्या भोजन व्यवस्थेसह शिधा देण्यात आला आहे. अन्य मदतीची आकडेवारी मोठी आहे. अशा स्थितीत पालकमंत्री म्हणून भंडारा जिल्ह्यातील लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याऐवजी त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या कदम यांना सांगलीच्या पुराची चौकशी करण्याचा नैतिक अधिकार नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात