विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : निजामुद्दीन परिसरातील तबलिग जमात मरकजमधून बाहेर पडून भारतभर फिरणारे आणि पहिल्यापासूनच देशातील विविध मशिदींमध्ये असलेले परकीय मुल्ला, मौलवी आता पोलिसांच्या स्कँनरखाली आले आहेत. देशभरातील विविध शहरांमधील मशिदीतून पोलिसांच्या तावडीत सापडत आहेत.
चीन, इंडोनेशिया, मलेशिया, कझाकस्तान, बांगलादेश आदी देशातील हे मुल्ला, मौलवी टुरीस्ट व्हिसावर भारतात आल्याचे स्पष्ट होत आहे. जानेवारीच्या सुरवातीपासून विविध देशांमधून ते तबलिग मरकजमधील कार्यक्रमात सामील होण्यासाठी आले होते. मरकज परवा रात्रीपासून खाली करण्यास सुरवात केल्यानंतर तेथील एक – एक कारनामे आणि कारस्थाने बाहेर येण्यास सुरवात झाली. अनेकजण देशातील अनेक शहरांमधील मशिदीतून लपून बसल्याचेही उघड झाले. पोलिसांनी कडक कारवाई सुरू करून अटकसत्र आरंभले. या खेरीज सौदीतून परत येऊन प्रवासाची माहिती लपविणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आतापर्यंत पुढील ठिकाणी परकीय मुल्ला, मौलवी सापडलेले आहेत…
चंद्रपूर – ११
नेवासा (अहमदनगर) – १०
जामखेड (अहमदनगर) – १०
अंबूर (वेल्लोर, तमिळनाडू) – २०
लखनौ – ६
रांची – २२,
बिजनौर – ८
मेरठ – १९
तमाड (झारखंड) – ११
पाटणा – १२
हे परकीय मौलवी पर्यटन व्हिसावर भारतात आले असून मात्र ते धर्मप्रसार करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याची केंद्रीय गृहमंत्रालयाने कडक दखल घेतली आहे. या व्हिसाचा भंग असून या मौलवींवर व त्यांच्या यजमानांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App