पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वांद्रे, मुंबई येथे 2458 मेगावॅट क्षमतेच्या 454 सौर ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण संपन्न झाले.
राज्यात आलेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीत झालेले नुकसान पाहून पुण्या-मुंबईत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थीही चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी येत्या 28 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
राज्यात विशेषतः मराठवाड्यात यंदा पावसामुळे धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत यंदा अतिवृष्टी झाली असून, त्यात अमाप नुकसान झाले आहे. विशेषतः त्यात जवळपास 84 जणांचा बळीही गेला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारकडे हेक्टरी 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने अतिवृष्टी व महापुरात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुंबईत आले असता त्यांच्याकडे देखील मदतीची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
राज्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला असून, सुमारे 84 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पीडितांना तातडीची मदत देण्यास सुरुवात केली आहे.
कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. आर्यन खानने दिग्दर्शित केलेल्या “बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजविरोधात वानखेडेंनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या सिरीजमध्ये आपली बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबई : State government : यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून, जूनपासून आतापर्यंत पावसाशी निगडित विविध दुर्घटनांमध्ये ८४ जणांचा बळी गेला आहे. […]
पूरग्रस्तांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मदतकार्य सुरू केले असून अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना फूड पॅकेट्स व किराणा सामान किट वितरित केले. जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली तसेच खर्डा इथे सुद्धा मदत कार्य आणि धान्यवाटप करण्यात आले.
NCP म्हणजे दमबाजी – दमदाटी हे समीकरणच जणू बनले की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात असताना महाराष्ट्र सोडून वेगळेच ते समीकरण उदयाला आलेले दिसले.
विशेष प्रतिनिधी पुणे : change in the cabinet : सध्या राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल यांच्या चर्चांना जोरदार उधाण आले आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, […]
राज्यातील सहा जहाल माओवाद्यांनी 24 सप्टेंबरला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यापुढे आत्मसमर्पण केले आहे. त्यांच्यावर तब्बल 62 लाख रुपयांचा इनाम होता. यात तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. यातील दोघे विभागीय समिती सदस्य, एक कमांडर, दोन पीपीसीएम व एक एसीएस असून या सर्वांना आता शासनाकडूनच 52 लाख रुपये देण्यात येणार आहे. यावेळी रश्मी शुकला यांच्या हस्ते या माओवाद्यांच्या हाती संविधान सोपवण्यात आले.
लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना नेपाळ मधल्या Gen Z चे अचानक कौतुक वाटायला लागले. भारतात तशीच “क्रांती” घडवावीशी वाटली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या दाव्यातील हवा काढून टाकली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही, यावर चर्चांना उधाण आले असताना फडणवीस यांनी यावर भाष्य करताच चर्चांना नवा आयाम मिळाला आहे. माझ्यावर पक्ष फोडल्याचे आरोप केले जातात. पण जर कोणी म्हटले की, मी ठाकरे बंधूंना एकत्र केले, तर त्याचे श्रेय घेण्यास मला आनंदच वाटेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्रीकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका मांडली.
महाराष्ट्रात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरसह धाराशिव व लातूरच्या दौऱ्यावर होते. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी निर्देश जारी केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी भाग समजला जाणारा मराठवाडा देखील पुराच्या विळख्यात अडकला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. तसेच शेतांमध्ये पुराचे पाणी गेल्याने पिकांची नासाडी झाली असून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. अशात आता सरकारने पुढाकार घेतला असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू करण्यात आली आहे. तसेच पूरग्रस्त बाधित प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू-तांदूळ देण्यात येत आहे.
महाराष्ट्रात गत काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अमाप नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांचे जवळपास संपूर्ण मंत्रिमंडळ आजपासून अतिवृष्टीग्रस्तांच्या भेटीसाठी राज्याच्या राजधानीबाहेर पडले आहे.
अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण मंत्रिमंडळ पाहणी दौऱ्यावर असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राजकारण सुरू केले आहे. सरकारने निकष न लावत जेवढे नुकसान झाले आहे, तेवढी मदत द्यावी. अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्याला अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. दुष्काळी भाग समजला जाणारा मराठवाडा पूराने वेढला गेला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.
महाराष्ट्र ओल्या दुष्काळात बुडाला तरी राजकारण सुटत नाही; दमबाजी करण्याची हौस काही भागत नाही!!, असं म्हणायची वेळ सध्याच्या विरोधकांच्या राजकीय वर्तणुकीमुळे आली.
मदतीचे निकष आणि नियम यांचा कुठलाही अडथळा न आणता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी सर्व मदत देऊ, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरून मदतीची घोषणा केली
राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मंत्री संजय शिरसाट आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री आज संपूर्ण राज्याचा दौरा करत असून
राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, जनावरे आणि जनजीवन यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांच्या संसारावर संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारकडे ठोस मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणून या संकटाकडे पाहून शेतकऱ्यांना तातडीची आणि दीर्घकालीन मदत द्यावी, पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वास्तव पाहणी केली जावी, अशी त्यांची आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसलेला मॉर्फ केलेला फोटो व्हायरल केल्याने डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. याचा बदला घेण्यासाठी कल्याण जिल्हा भाजपने मोदींचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा भररस्त्यात साडी नेसवून सत्कार केला. यापुढे कोणत्याही वरिष्ठ नेत्याची बदनामी केल्यास अशीच परिस्थिती होईल, असा इशाराही भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सर्वच भागांत हाहाकार उडाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकार कर्जमाफीच्या मुद्यावर गंभीर असल्याचा पुनरुच्चार केला आहे. सरकार कर्जमाफीच्या मुद्यावर अत्यंत गंभीर आहे. यासंबंधी योग्यवेळी निर्णय घेतला जाईल. सरकार या प्रकरणी कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असे ते म्हणालेत.
मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पाहणीनंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी पीक नुकसानभरपाई जाहीर केली आहे. खरीप 2025 मधील पिकांच्या नुकसानीसाठी 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने याबाबतचा शासन निर्णय आजच जाहीर केला असून, ही रक्कम आजपासूनच वितरीत केली जाणार आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App