राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सोमवारी नव्याने बांधलेल्या संघ भवन आणि भीमराव आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, आपण परस्पर मतभेदांमध्ये अडकलो आणि परकीय आक्रमकांनी त्याचा फायदा घेतला
म्हणे, अजितदादांच्या अर्थ खात्यात मुख्यमंत्रीची घुसखोरी; “पोस्टर वरचे मुख्यमंत्री” रोहितदादांनी “पवार बुद्धी” पाजळली!!
काँग्रेसमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी मुस्लिम पक्षाध्यक्ष करून दाखवावा आणि निवडणुकीचे 50 % तिकिटे मुसलमानांना द्यावीत
चाणक्य फेम अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते काल चैत्र वद्य प्रतिपदेच्या दिवशी रामतीर्थावर गोदावरीची महाआरती करण्यात आली. मनोज जोशी हे त्यांच्या चाणक्य महानाट्याच्या निमित्ताने नाशिक मध्ये आले होते. यावेळी त्यांना रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने गोदावरी महाआरतीचे निमंत्रण दिले. या निमंत्रणाचा सहर्ष स्वीकार करून मनोज जोशी आणि त्यांच्या टीमने रामतीर्थाला भेट दिली.
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज नाशिकच्या काळाराम मंदिर आणि रामतीर्थावर समतेची आरती करण्यात येणार असून या आरतीद्वारे सामाजिक समता बंधुता समरसता आणि एकात्मतेचा दीप उजळण्याचा अनोखा उपक्रम रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि अनुलोम ही संस्था करणार आहे.
जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने अजित पवार, शरद पवार एकत्र आल्याचे दिसले. मात्र, त्या कौटुंबिक सोहळ्याचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. काका-पुतण्यातील दरी कायम असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातील आरोपीने नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केली. आरोपी विशाल गवळीचा (३५) मृतदेह रविवारी सकाळी तुरुंगाच्या शौचालयात लटकलेल्या अवस्थेत सापडला, असे पोलिसांनी सांगितले. आम्हाला देवानेच न्याय दिला,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. वर्धा येथील आर्वी येथे बोलत असताना फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिवसभर शेतीसाठी मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. तसेच महाराष्ट्रात दरवर्षी विजेचे बिल कमी होणार, अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली आहे.
शरद पवारांची अघोषित निवृत्ती, महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांना कत्ती; छोट्या मोठ्या कामांवर दृष्टी!! असे शरद पवारांच्या गेल्या काही आठवड्या मधल्या राजकीय कृतींवरून समोर आलेय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी वलसाड जिल्ह्यातील श्री भव भावेश्वर महादेव मंदिराच्या रौप्यमहोत्सवी समारंभाला उपस्थिती लावली. येथे त्यांनी देशात सुरू असलेल्या धर्मांतराच्या मुद्द्यावर चर्चा केली. ते म्हणाले की धर्म सर्वांना आनंदाकडे घेऊन जाऊ शकतो, आपण लोभ किंवा भीतीमुळे धर्म बदलू नये.
छत्रपती शिवाजींनी हिंदवी स्वराज्य निर्माण करून महाराष्ट्रात स्वधर्म स्वभाषा याविषयी जाज्वल्य अभिमान निर्माण केला.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथी निमित्ताने स्वराज्याची राजधानी रायगडावर झालेल्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी केलेल्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजूर केल्या.
राज्यभरातून पुण्यात येऊन MPSC चा अभ्यास करण्यासाठी आलेल्या निवडक विद्यार्थ्यांनी काल शुक्रवारी सायंकाळी “अचानक” आंदोलन केले.
एमआयएमचे नेते तथा छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज अचानक मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समजला नाही. पण यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत.
यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल, असे आश्वासन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले. ते एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य व परिवहन आयुक्त विवेक भीमनराव, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व सर्व खाते प्रमुख उपस्थिती होते.
अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आलेल्या पाकिस्तानी वंशाच्या दहशतवादी तहव्वुर राणाच्या चौकशीत महाराष्ट्र सरकार राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) पूर्ण सहकार्य करेल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
भारत क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट इकॉनॉमीचे जागतिक नेतृत्व करेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला.
हा उपक्रम भारत सरकार व अणुऊर्जा नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार राबवला जाणार असून,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे पिंपरी चिंचवड शहरात प्रायोगिक तत्त्वावर ई-ट्रांझिट सुरू
बनेश्वरच्या सहाशे मीटरच्या रस्त्यावरून सात तास उपोषण करणाऱ्या सुप्रिया सुळेंची सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडवली
एफबी म्हणजे फुकटचा बाबूराव, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टोला लगावला आहे. सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले, या प्रसंगी भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. तसेच मी पण एफबी म्हणजे ‘फेव्हरेट भाऊ’, असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
पश्चिम रेल्वेने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे की, माहीम खाडी पुलाच्या पुनर्बांधणीमुळे ११-१२ एप्रिल रोजी एकूण ५१९ गाड्या प्रभावित होतील. पश्चिम रेल्वे ११-१२ एप्रिल आणि १२-१३ एप्रिलच्या रात्री पुलाची दुरुस्ती करेल.
भोर तालुक्यातल्या बनेश्वर मधल्या 750 मीटरच्या रस्त्यासाठी 7 तासांचे खासदार सुप्रिया सुळे यांचे उपोषण आंदोलन गाजले.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी तथा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्याप्रकरणी गत महिन्याभरापासून तुरुंगात असणाऱ्या प्रशांत कोरटकरला आज अखेर जामीन मंजूर करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला हा दिलासा दिला आहे.
मुंबई सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश दिलेत. कोर्टाने या प्रकरणी मुंडे यांनी दंडाधिकारी कोर्टाच्या आदेशांना दिलेली आव्हान याचिका फेटाळून लावली. करुणा व धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहेत. या दोघांनी 2 मुलांना जन्म दिला. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण कोर्टाने यासंबंधी नोंदवले आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App