उपमुख्यमंत्री अजित पवार विकासाच्या मुद्द्यावर बोलायचे सोडून वाद निर्माण करत आहेत. महायुतीतल्या सहयोगी पक्षावर किती आणि कसे बोलायचे हे त्यांनी ठरविले पाहिजे. अन्यथा मी बोलायचे ठरविले तर मी काय बोलू शकतो, कसे बोलू शकतो आणि कशी उत्तरे देऊ शकतो, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, अशा परखड शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पुन्हा एकदा इशारा दिला. फडणवीसांनी या इशाऱ्यातून आमदार महेश लांडगे यांना बूस्टर डोस दिला.
शिंदे, आंबेडकरांची पुढची पिढी धडाक्याने प्रचारात; ठाकरे, पवारांची पुढची पिढी सुद्धा बसली घरात!!, असेच राजकीय चित्र महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने समोर आले.
अंबरनाथ नगपरिषदेसाठी भाजप आणि काँग्रेसची युती झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. ठाकरेंपासून शिंदेपर्यंत साऱ्यांनी भाजपवर आरोप केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अभद्र युती तोडण्याचे आदेश दिले. आता या राजकीय नाट्याचा दुसरा प्रसंग रंगला असून, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना आता भाजपने प्रवेश दिलाय. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
देशाची आर्थिक राजधानी आणि मराठी माणसाच्या संघर्षातून उभे राहिलेले शहर. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली
शरद पवार “सिंह” आणि अजित पवार “वाघ’; पण दोघेही अडकलेत दोन महापालिकांच्या पिंजऱ्यात!!, अशीच राजकीय अवस्था शरद पवार आणि अजित पवारांची झाली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येच अडकल्याची टीका झाल्यानंतर अजितदादांना आली जाग, महाराष्ट्रात अजून दोन-चार ठिकाणी फिरणार शेवटच्या टप्प्यात!!, अशी अवस्था अजित पवारांची झाली आहे.
कुलाबा वॉर्डातील उमेदवारी अर्जावरून निर्माण झालेल्या वादानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “हा केवळ राजकीयदृष्ट्या प्रेरित ‘फेक नॅरेटिव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न आहे,” असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. ज्या महिलेने दबाव टाकल्याचा आरोप केला आहे, तिला आपण कधी पाहिले नाही किंवा भेटलोही नाही. उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी रुपये मागण्याचे ह्या लोकांनी प्रयत्न केले होते, असा आरोपही राहुल नार्वेकर यांनी केला.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच वांद्रे (बांद्रा) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर प्रचारादरम्यान अज्ञाताने जीवघेणा हल्ला केला आहे. हल्लेखोराने कुरेशी यांच्या पोटात थेट चाकू भोसकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून एमआयएम पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
“आमची राजकीय लढाई काँग्रेस पक्षाशी असली, तरी दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे, अशा नेत्यांमध्ये विलासरावांचे नाव प्रमुख आहे, हे सांगताना मला कोणताही संकोच वाटत नाही,”
सत्तेसाठी एमआयएमशी हातमिळवणी करणे अकोटमधील भाजप नेत्यांना चांगलेच महागात पडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही युती ‘तत्वशून्य’ असल्याचे सांगत कडक कारवाईचे संकेत दिल्यानंतर, अवघ्या काही तासांतच अकोटमधील भाजप-एमआयएम युती तुटली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप नेतृत्व आता स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांना ‘कारण दाखवा’ नोटीस बजावणार आहे.
अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका असून आधी त्यांनी स्वतःच्या मुलाचा पराक्रम पाहावा आणि नंतर आमच्यावर टीका करावी, असा टोला भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी लगावला आहे. तसेच अजित पवार हे स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपसोबत आले आहेत, त्यांनी आम्हाला शिकवू नये, अशी खरमरीत टीका लांडगे यांनी केली आहे. अजित पवारांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर लांडगे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर दिले आहे.
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातच कलगीतुरा रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी पक्षातील हे दोन मित्रपक्षच एकमेकांवर जोरदार टीका करत असल्याने, निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडी आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्याचे चित्र पाहता ही निवडणूक विरोधकांविरुद्ध नसून सत्ताधाऱ्यांमध्येच अंतर्गत सुरू असल्याचे भासत आहे.
महापालिकांच्या निवडणुका मध्यावर आले असताना ठाकरे बंधू बसले अजूनही घरी पण एकनाथ शिंदे यांची मात्र नाशिक पाठोपाठ विदर्भात मुशाफिरी!!, असेच राजकीय चित्र आज समोर आले.
पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांची पूर्ती झाली “शोभा”; स्थानिक आणि किरकोळ निवडणूकांमध्ये निघाली हवा, असेच म्हणायची वेळ अजित पवार आणि रोहित पवारांच्या राजकीय अवस्थेवरून येऊन ठेपली.
अंबरनाथ आणि अकोट मध्ये भाजपने अनुक्रमे काँग्रेस आणि AIMIM पक्षाशी युती केल्याने भाजप सत्तेसाठी काही करू शकतो
मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर अकोट विकास मंच सावरायला आले रणधीर सावरकर!!, असेच राजकीय चित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या गंभीर इशाऱ्यानंतर समोर आले.
रोहित पवारांना मुंबई हायकोर्टाने जोरदार दणका दिला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला स्थगिती दिली. रोहित पवारांनी मतदार यादी मध्ये अचानक वाढ केली. ती वाढ करताना त्या यादीत स्वतःचे सगळे नातेवाईक घुसविले, असा आरोप करणारी याचिका क्रिकेटपटू केदार जाधव यांनी हायकोर्टात केली होती. हायकोर्टाने सकृत दर्शनी त्यांचे म्हणणे मान्य केले असून निवडणुकीला स्थगिती दिली. मतदार यादीवर घेतलेल्या आक्षेपांवर पारदर्शक पद्धतीने समाधानकारक तोडगा काढत नाही तोपर्यंत निवडणूक घेता येणार नाही, असा स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टाने दिला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मोहाळा (ता. अकोट) येथे एका प्रार्थना-स्थळाजवळ जीवघेणा हल्ला झाल्याची घटना मंगळवारी ६ जानेवारीला दुपारी घडली. जीवघेण्या हल्ल्यात पटेल यांच्या पोटावर, मानेवर चाकूने वार केले. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील हिदायत पटेल यांच्यावर अकोट येथे प्राथमिक उपचार करुन त्यांना अकोला येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अकोला येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
दहा मनपात भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ६८ तर मालेगावात इस्लाम पक्षाचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला. त्यानंतर ७२ तासांनी विरोधकांनी त्यावर आगपाखड करत उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी कधी होणार हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, बिनविरोधवरून सुरू झालेला वाद अजून पेटलेलाच आहे. या प्रकरणात पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिखट हल्ला केला.
पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’सारख्या योजनांमुळे महिलांमध्ये सरकारबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. विकास, संवेदनशीलता आणि जनतेशी थेट संवाद या बळावर पुण्यात शिवसेनेचा भगवा निश्चितच फडकणार, असा विश्वास शिवसेनेच्या ( शिंदे गट) नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला
केवळ सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर अजितदादांना घेरून ते वठणीवर येतील का??, असा सवाल अजित पवार आणि भाजप नेते यांच्या दुहेरी राजकारणातून समोर आलाय.
सुरेश कलमाडी कालवश झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या राजकीय सामाजिक आणि क्रीडा विषयक आठवणी जागविल्या. कलमाडींनी पुण्यापासून दिल्लीचे राजकारण कसे हलविले होते, याच्या आठवणी अनेकांनी सांगितल्या.
महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार ब्रँड लै मोठे आहेत, तर ते मुंबई + ठाण्यात आणि पुणे + पिंपरी चिंचवड मध्येच काय अडकलेत??, असा सवाल महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने समोर आलाय.
राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली असून, निवडणूक आयोगाची भरारी पथके सध्या अत्यंत सतर्क आहेत. मुंबईसह विविध महानगरांमध्ये संशयास्पद वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App