पार्थ पवार कोरेगाव पार्क मधली जमीन शासनाला परत करणार??, की राजकीय वाद + कायद्याच्या कचाट्यातून मान सोडवून घेण्यासाठी नवा डाव??
पुण्यातल्या कोरेगाव पार्क मध्ये आयटी पार्क आणि डेटा सेंटर सुरू करण्याच्या नावाखाली 300 कोटी रुपयांना विकत घेतलेली महार वतन/सरकारी जमीन अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे शासनाला परत करणार असल्याची बातमी काही मराठी माध्यमांनी दिली. मात्र पार्थ पवार ही जमीन खरंच शासनाला परत करणार, की केवळ राजकीय वादातून आणि कायद्याच्या कचाट्यातून मान सोडवून घेण्यासाठी अजित पवार नवा राजकीय डाव खेळणार??, असा सवाल मात्र यातून पुढे आला आहे.