• Download App
    Artificial Intelligence आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सिस्टीम!!

    आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सिस्टीम!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक झाली.

    राज्यातील मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचे सौम्यीकरण करण्यावर भर द्यावा, तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सिस्टीम विकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.



    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रत्येक वर्षी मॉन्सून नवीन आव्हाने घेऊन येतो. त्यामुळे मागील अनुभवांच्या आधारे अधिक सक्षम तयारी करणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी मानक कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करावी. यंत्रणांचा तातडीचा प्रतिसाद, वेळेत इशारे आणि प्रभावित नागरिकांपर्यंत जलद मदत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

    पुढील 15 दिवसांत सर्व विभागांनी तयारीची पुन्हा पडताळणी करून त्रुटी दूर कराव्यात. मंत्रालय, पोलीस, महानगरपालिका आणि विविध नियंत्रण कक्षांचे एकत्रीकरण करून एकात्मिक प्रतिसाद प्रणाली उभारण्याच्या सूचना देण्याबरोबरच या मॉन्सूनमध्ये सर्व यंत्रणांनी सतर्क राहून नागरिकांना जास्तीत जास्त दिलासा द्यावा, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री मकरंद जाधव पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    Artificial Intelligence (AI) based integrated command and control system for disaster management!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : ‘मोदी केवळ सर्वाधिक काळ पंतप्रधान नाहीत, तर सर्वोत्कृष्टही’; फडणवीसांकडून गौरव, काँग्रेसला ‘बुडते जहाज’ म्हणत विरोधकांवर निशाणा

    Devendra Fadnavis : कर्जमाफीत अट नाही, तर बँकिंग व्यवस्था वाचवण्याची तरतूद’; फडणवीसांचा खुलासा, 40 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ

    Shalarth ID : शालार्थ आयडीसाठी अधिकाऱ्यांना आता 15 दिवसांचीच मुदत; हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर सरकारचा मोठा निर्णय