• Download App
    Maharashtra महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची नुसतीच चर्चा; प्रत्यक्षात तामिळनाडूत झाले ऑपरेशन शिट्टी!!

    महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची नुसतीच चर्चा; प्रत्यक्षात तामिळनाडूत झाले ऑपरेशन शिट्टी!!

    नाशिक : महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची नुसतीच चर्चा; प्रत्यक्षात तामिळनाडू झाले ऑपरेशन शिट्टी!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.

    महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार फोडून आपल्या शिवसेनेत आणणार आणि महाराष्ट्रात आपले राजकीय बळ वाढवणार अशा बातम्या गेला महिनाभर वारंवार आल्या.

    उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली की लगेच मराठी माध्यमांनी ऑपरेशन टायगरची चर्चा चालू ठेवली. पण प्रत्यक्षात अजून तरी एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार फोडले नाहीत. याच दरम्यान एकनाथ शिंदे यांचे किमान दोन दिल्ली दौरे झाले, पण तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरेंचे खासदार सोडून ऑपरेशन टायगर झाले नाही.

    – अण्णा द्रमुक पक्षाच्या तीन आमदारांचे राजीनामे

    पण त्याच्या आधीच आज तामिळनाडू मधून ऑपरेशन शिट्टी प्रत्यक्षात वाजल्याची बातमी आली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे चिन्ह शिट्टी आहे. विजय जोसेफ यांनी हीच शिट्टी वाजवून अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे तीन आमदार फोडले. अण्णा द्रमूकचे आमदार सत्यंबा, मार्गथम कुमारवेल आणि जयकुमार यांनी आपल्या आमदारकीचे राजीनामे तामिळनाडूचे विधानसभा अध्यक्ष जे‌. सी. डी‌ प्रभाकरन यांच्याकडे पाठवून दिले.

    – पोटनिवडणुकीतून हेच तीन आमदार शिट्टीवर

    आता हे तिन्ही आमदार त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवून शिट्टी चिन्हावर पुन्हा आमदार होणार आहेत. त्यामुळे विजय यांच्या पक्षाची वाटचाल स्वबळावर बहुमताकडे होणार आहे. अर्थात विजय जोसेफ यांचा तोच राजकीय डाव आहे. कारण तामिळनाडू विधानसभा निवडणूक त्यांना पूर्ण बहुमत मिळू शकले नाही त्यांचे फक्त 107 आमदार निवडून आले. त्यामुळे त्यांना काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागते आहे‌.

    विजय यांना आपले राजकीय अवलंबित्व कमी करायचे आहे, म्हणून तर विजय यांनी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या तीन आमदारांना राजीनामा द्यायला लावून पोटनिवडणुकीची तयारी केली आहे. आता या तीन आमदारांना पोटनिवडणुकीत शिट्टी चिन्हावर उभे करून निवडून आणले की विजय पूर्ण बहुमताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकतील.

    Operation Tiger is just a talk in Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मनोज जरांगे आले आणि रोहित पवारांनाच टोले हाणून गेले!!

    Pranit More : ‘माझ्यावरची टीका योग्यच’; वादानंतर प्रणित मोरेची जाहीर माफी, म्हणाला- ‘एक संधी द्या, स्वतःला बदलून दाखवेन’

    रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस; पण बॉडी लँग्वेज मध्ये ना थकावट, ना उत्साहात कमी!!