Maharashtra : महाराष्ट्रात ‘व्यावहारिक मराठी’ अनिवार्य; प्रवासी सुरक्षेसह भाषिक स्वाभिमानाचा नवा अध्याय, महाराष्ट्र मोटार वाहन नियमात सुधारणा
“मराठी ही कोणाला दूर करणारी भाषा नाही, तर माणसाला माणसाशी जोडणारी भाषा आहे.” या भावनेतून महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.