• Download App
    Maharashtra महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्राची 733.28 कोटी रुपयांची यो

    महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्राची 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर!!

    maharashra

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाची मोहीम मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीपासूनच सुरू केली असून, आता त्याला केंद्र सरकारचे सुद्धा बळ मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली.

    महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. या योजनेत 60 टक्के निधी केंद्र सरकार तर 40 टक्के निधी राज्य सरकार देईल, असे मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये नमूद केले.



    – “या” कामांसाठी होणार वापर

    महाराष्ट्र पोलिस दलासाठी इतका मोठा निधी मंजूर केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांचा अतिशय मनापासून आभारी आहे. महाराष्ट्रातलीसागरी सुरक्षा, ड्रग्जविरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, एआय तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहने अशा अनेक दृष्टीने महाराष्ट्र पोलिस दल अधिक सुसज्ज करणे यातून शक्य होणार आहे, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विट मधून लक्ष वेधले.

    Centre approves ₹733.28 crore scheme for the modernization of the Maharashtra Police force!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार? खासदार सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण

    Chhagan Bhujbal : धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता; पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

    Gunratna Sadavarte : ठाकरे हे आपल्या दोन्ही लेकरांच्या प्रमोशनसाठी आले; गुणरत्न सदावर्तेंची तिरंगा रॅलीवर टीका, म्हणाले- घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली