• Download App
    Vikas Lawande वारकऱ्यांची बदनामी करणाऱ्या विकास लवांडेंना न्यायालयाचा दणका; येरवडा कारागृहात रवानगी!!

    वारकऱ्यांची बदनामी करणाऱ्या विकास लवांडेंना न्यायालयाचा दणका; येरवडा कारागृहात रवानगी!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : वारकरी संप्रदायाविरुद्ध वादग्रस्त आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. शुक्रवारी (दि. २२) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने लवांडेंना न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे त्यांची तात्काळ येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वारकरी संप्रदायाची बदनामी करणाऱ्या प्रवृत्तींना मोठा चपराक बसल्याची भावना समाजात उमटत आहे.

    काही दिवसांपूर्वी राजकीय कार्यकर्ते असलेल्या विकास लवांडेंनी वारकरी संप्रदायातील २० कीर्तनकारांना ‘घुसखोर’ म्हणून घोषित केले होते. यामध्ये ज्यांच्या घरात कित्येक पिढ्यांची पवित्र वारकरी परंपरा आहे, अशा पूजनीय भास्करगिरी महाराज, निवृत्ती महाराज नामदास, चैतन्य महाराज देगलूरकर आणि राणा महाराज वासकर यांसारख्या आदरणीय महनीय संतांचा व कीर्तनकारांचा समावेश होता. एखाद्या गुन्हेगारांची यादी जाहीर करावी, तसा उद्दामपणा लवांडे यांनी केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली होती. “कोणतीही धार्मिक किंवा आध्यात्मिक योग्यता नसताना वारकरी संप्रदायाची बदनामी करण्याचा अधिकार लवांडेंना कोणी दिला?” असा थेट प्रश्न वारकरी संप्रदायाकडून विचारण्यात येत होता.



     हिंदू धर्मात फूट पाडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न?

    लवांडे केवळ कीर्तनकारांवर टीका करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी “वारकरी हा हिंदू धर्मापेक्षा एक स्वतंत्र धर्म आहे,” अशी नवी आणि वादग्रस्त मांडणी समाजमाध्यमांवर सुरू केली होती. संतांच्या सर्वसमावेशक शिकवणीला हरताळ फासत, समाजात द्वेषाचे व भेदाचे वातावरण निर्माण करणाऱ्या लवांडेंच्या मागे नक्की कोणती अदृश्य राजकीय शक्ती कार्यरत आहे, अशी चर्चा आता वारकरी संप्रदायातील प्रमुख संस्था आणि प्रमुखांमध्ये रंगली आहे.

    – समर्थकांकडून तांत्रिक चुकीचे अवडंबर; न्यायालयाकडून युक्तिवाद ग्राह्य

    दरम्यान, लवांडे यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक पोलिसांच्या एका तांत्रिक चुकीचा आधार घेऊन समाजमाध्यमांवर अपप्रचार केला. २०१७ मधील एका जुन्या गुन्ह्यात लवांडे हे निर्दोष सुटले असतानाही पोलिसांच्या आरोपपत्रात त्याचा अनावधानाने उल्लेख झाला होता. याच तांत्रिक मुद्द्याचा गैरफायदा घेत समर्थकांनी ही ‘बेकायदेशीर आणि खोटी अटक’ असल्याचा आव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, माननीय न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि मूळ गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन समर्थकांचे दावे फेटाळले आणि लवांडेंना थेट तुरुंगाची हवा दाखवली.

    Court slaps Vikas Lawande for defaming Warkaris

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पतीचा पत्नीवर ॲसिड हल्ला; राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेत पोलिसांना दिले महत्वाचे आदेश!!

    आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सिस्टीम!!

    पवारांच्या बारामतीत गांजाची तस्करी; तब्बल ६३४ किलो गांजासह ३ कोटींचा मुद्देमाल जप्त; ७ तस्करांना अटक!!