नाशिक : रयत शिक्षण संस्थेत पवारांची मक्तेदारी अध्यक्ष पदावर आणली नातवाची पिढी!!, अशी घडामोड नुकतीच घडवून आणली गेली.
शरद पवारांनी दोन आठवड्यांपूर्वी रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी त्यांनी भाषण करून शिक्षण व्यवस्थेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे शिक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन केले होते. त्यावेळी त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कारभाराचा आढावा घेतला होता.
पण शरद पवारांनी कालच त्या पलिकडे जाऊन रयत शिक्षण संस्थेच्या कारभारात घराणेशाही घट्ट केली. शरद पवारांनी कालच आमदार रोहित पवारांना नवी जबाबदारी दिली. पवारांनी रोहित पवारांची रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती केली. स्वतः रोहित पवारांनी ट्विट करून ही माहिती दिली.
रोहित पवारांचे ट्विट असे :
बहुजन समाजाच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या आणि आज आदरणीय पवार साहेबांच्या हाती धुरा असलेल्या ‘रयत शिक्षण संस्थे’च्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आदरणीय पवार साहेब आणि संस्थेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार! मागील गेली सहा वर्षे संस्थेवर सदस्य म्हणून आणि सर्वांना सोबत घेऊन केलेल्या कामाची ही पोचपावतीच आहे, असं मी मानतो. भविष्यातही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांवर चालताना आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखाली सर्वांच्या सहकार्याने अधिकाधिक चांगल्या कामाच्या माध्यमातून दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.
पुनश्च सर्वांचे आभार!
या ट्विट मध्ये रोहित पवारांनी शिक्षणाविषयी पोपटपंची बरीच केली. शरद पवारांचे आभार मानले. पण प्रत्यक्षात पवारांनी रयत शिक्षण संस्थेच्या कारभारात स्वतःची घराणेशाही घट्ट केली, यावर मात्र रोहित पवार मूग गिळून गप्प बसले.
– पवार शिक्षण संस्था : उदयनराजेंची टीका
पण त्यामुळेच खासदार उदयनराजे भोसले यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कारभारावर २०२२ मध्ये केलेली टीका सिद्ध झाली. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था करा, अशी टीका केली होती. रयत शिक्षण संस्थेच्या कारभारात पारदर्शकता नाही. नियमानुसार या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावर पदसिद्ध मुख्यमंत्री असायला हवे असताना शरद पवारांनीच कायम स्वतःकडेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद ठेवले. पवारांनीच ही शिक्षण संस्था बळकावली. रयत शिक्षण संस्थेला सातारा राजघराण्याने जमीन दिली. पण पवारांनी संस्थे स्वतःची माणसे घुसवली. संस्था वाढविण्यासाठी ज्यांचे योगदान नाही, त्यांना मेंबर केले. पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे सगळे नियमच बदलून टाकले. रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण केले. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून ते पवार शिक्षण संस्था करा, असे शरसंधान उदयनराजे भोसले यांनी सोडले होते.
शरद पवारांनी रोहित पवारांना रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करून उदयनराजे भोसले यांनी केलेली टीका खरी असल्याचे सिद्ध केले.
Rohit Pawar appointed president of rayat shikshan Sanstha (uttar Maharashtra)
महत्वाच्या बातम्या
- डिजिटल अर्थव्यवस्था आणि उद्योग क्षेत्रात भारत – सायप्रस मैत्री अधिक मजबूत; महाराष्ट्र $660 अब्ज अर्थव्यवस्थेचे राज्य!!
- Philippines : फिलिपाइन्सच्या एका बेटावर ‘एआय’ सरकार; मंत्रिमंडळात गांधी आणि मंडेला यांच्यासारखे 17 डिजिटल अवतार
- महाराष्ट्रातल्या कौशल्य विकासासाठी दक्षिण कोरियातल्या लर्निंग फॅक्टरी मॉडेलची मदत; अनेक करारांवर स्वाक्षऱ्या!!
- राष्ट्रवादीवर पवार कुटुंबीयांचा संपूर्ण कब्जाचा डाव बारगळला; सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत त्याच्या खुणा दिसल्या!!