• Download App
    Eknath Shinde बारक्या पक्षांना गिळून एकनाथ शिंदेंची दमदार वाटचाल; पण पवार संस्कारितांचा सत्तेत आणि विरोधात दोन्हीकडे धडपडाट!!

    बारक्या पक्षांना गिळून एकनाथ शिंदेंची दमदार वाटचाल; पण पवार संस्कारितांचा सत्तेत आणि विरोधात दोन्हीकडे धडपडाट!!

    नाशिक : बारक्या पक्षांना गिळून एकनाथ शिंदेंची दमदार वाटचाल; पवार संस्कारितांचा सत्तेत आणि विरोधात दोन्हीकडे धडपडाट!!, हेच राजकीय चित्र विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात समोर आले. Eknath Shinde

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारक्या पक्षांना गिळंकृत करून शिवसेना वाढीची “चाल” खेळली. त्यांनी या चालीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मान्यता सुद्धा मिळवली. म्हणून तर ते अमित शहा यांना भेटायला दिल्लीला गेले होते. अमित शाह यांच्याशी भेट झाल्याची कबुली सुद्धा त्यांनी दिली. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाराष्ट्र भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पाय कापतो म्हणून महाराष्ट्रातल्या नेत्यांची तक्रार करायला ते तिकडे गेले असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या, पण प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला आपल्या गळाला लावले आणि बच्चू कडू यांची वर्णी विधान परिषदेवर लावली. ती काही अमित शाह यांच्या परवानगीशिवाय लावली नसणार, याची खात्री त्यांच्या राजकीय कृतीतून पटली.

    – हितेंद्र ठाकूर शिंदेंच्या भेटीला

    एकनाथ शिंदे अमित शाह यांना भेटून आल्यानंतर त्यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याची बातमी आली. हितेंद्र ठाकूर देखील एकनाथ शिंदे यांना भेटायला ठाण्यात आले. त्यांनी विधान परिषदेवर आपल्या मुलाची वर्णी लावून घेतली.

    – शिंदेंचे बेरजेचे राजकारण

    या सगळ्यातून एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचा एक पॅटर्न समोर आला. महाराष्ट्रातल्या छोट्या पक्षांना शिवसेनेत सामावून घेऊन स्वबळ वाढवा त्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांची परवानगी घ्या आणि इतर पक्षांना नामोहरम करा हा तो पॅटर्न दिसून आला. पण मराठी माध्यमांनी त्याचे वर्णन एकनाथ शिंदे भाजपलाच आव्हान देण्याच्या बेतात असल्याचे करून आपले अज्ञान प्रकट केले. वास्तविक बच्चू कडू आणि हितेंद्र ठाकूर यांच्यासारखे पारंपारिक भाजप विरोधक गळाला लावून एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या विस्ताराचेच काम केले, जे मोदी आणि शाहांना अपेक्षित राहिले. यातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बळाबरोबरच महायुतीचे बळ सुद्धा वाढले.

    – पवार संस्कारितांची धडपड

    या पार्श्वभूमीवर पवार संस्कारितांचा मात्र सत्तेत आणि विरोधात सुद्धा धडपड सुरू असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार कुटुंबीयांचे वर्चस्व टिकवून धरण्यासाठी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांना जंग जंग पछाडावे लागले. एवढे करूनही पार्थ पवारांना आपल्या चॉईसचा उमेदवार विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर पाठवता आला नाही. सगळ्या पवार कुटुंबीयांनी जंग पछाडून सुद्धा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना नामोहरम करता आले नाही. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अपमान सहन केला. पण त्यांनी राष्ट्रवादीवर पवार कुटुंबीयांचे एकतर्फी वर्चस्व निर्माण होऊ दिले नाही. पवार कुटुंबीयांची तीव्र इच्छा असून सुद्धा दोन्ही राष्ट्रवादींवर कौटुंबिक वर्चस्व टिकवून धरता आले नाही. पवारांना पक्षाच्या इतर नेत्यांना डावलता आले नाही. उलट सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांचे नेतृत्व खुंटा हलवून बळकट झाले. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना पुण्याची विधान परिषदेची जागा टिकवून धरण्यासाठी धडपड करावी लागली. एवढे करूनही पुण्याची जागा मिळण्याची गॅरंटी सुद्धा भाजपने दिली नाही.

    – ट्विट करण्यापुरते नेतृत्व

    शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे नेतृत्व फक्त ट्विट करण्यापुरते आणि छोटी – मोठी आंदोलने करण्यापुरते शिल्लक राहिले. रोहित पवारांनी नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड मध्ये येऊन कांद्याची माळ गळ्यात घालून जोरदार भाषण ठोकले. पण एकीकडे एकनाथ शिंदे सत्ताधारी आघाडीत राहुल शिवसेनेची संघटनात्मक वाढ करत असताना पवार संस्कारित नेत्यांना मात्र आपापले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडाट करावा लागल्याचेच वास्तव चित्र महाराष्ट्रासमोर आले.

    Eknath Shinde’s strong journey

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्याऔना मुदतवाढ; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    मोदी सरकार पाडायचा मनसूबा; पण प्रादेशिक पक्षांवर घाव; राहुल गांधीचा तिरपागडा राजकीय न्याय!!

    Rupali Ganguly : ध्रुव राठीवर संतापली अनुपमा फेम अभिनेत्री; म्हटले – देशाला परदेशात बसलेल्या यूट्यूबरची गरज नाही