विशेष प्रतिनिधी
मुंबई : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गो तस्करी आणि जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. गायांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर बुलडोझर कारवाईसह कडक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे पत्रक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जारी केले.Bulldozers will be used against those who transport cows illegally in Maharashtra; Transport Minister Pratap Sarnaik warns
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने राज्यभर विशेष तपास मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. २५ मे ते २८ मे दरम्यान विभागीय परिवहन अधिकारी, उपविभागीय परिवहन अधिकारी, सीमा तपासणी नाके आणि वाहतूक यंत्रणेला युद्धपातळीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. महाराष्ट्रात फडणवीस सरकारने गाईला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. हिंदू समाजासाठी गाय ही श्रद्धा आणि संस्कृतीचा विषय असल्याने तिची हत्या किंवा अवैध वाहतूक सहन केली जाणार नाही, अशी माहिती प्रताप सरनाईकांनी दिली.
– वाहने जप्त होणार
राज्यात गो तस्करीचे प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. जनावरांना उपाशी ठेवणे, अमानुष पद्धतीने वाहनांमध्ये कोंबून नेणे आणि अवैध कत्तलखान्यांकडे पुरवठा करणे, असे प्रकार रोखण्यासाठी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे गाईंची अवैध वाहतूक करणाऱ्या दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नसून त्यांची वाहने कायमची जप्त केली जाणार आहेत.
Bulldozers will be used against those who transport cows illegally in Maharashtra; Transport Minister Pratap Sarnaik warns
महत्वाच्या बातम्या
- लॉजिस्टिक्स आणि कनेक्टिव्हिटीचे नवे पॉवरहाऊस नागपूर; गोदाम लॉजिस्टिक पार्कचा शुभारंभ!!
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले-:मला हुकूमशहा म्हटल्याने हरकत नाही, मूर्ख म्हटल्यावर वाईट वाटते
- US H-1B : अमेरिकेने H-1B आणि ग्रीन कार्ड नियम कठोर केले:भारतीय व्यावसायिकांची चिंता वाढली
- शिर्डीच्या डिफेन्स हब मध्ये मेक इन इंडियाची धूम; पण तिथे उत्पादन होणार कसले??