महाराष्ट्रात गाईंची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर चालणार बुलडोझर; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गो तस्करी आणि जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. गायांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर बुलडोझर कारवाईसह कडक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे पत्रक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जारी केले.