• Download App
    Shirdi's defense शिर्डीच्या डिफेन्स हब मध्ये मेक इन इंडियाची धूम; पण तिथे उत्पादन होणार कसले??

    शिर्डीच्या डिफेन्स हब मध्ये मेक इन इंडियाची धूम; पण तिथे उत्पादन होणार कसले??

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : साईबाबांच्या शिर्डीत भक्ती आणि शक्तीचा संगम झाला. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज शिर्डी, अहिल्यानगर येथे निबे ग्रुप आणि विविध कंपन्यांदरम्यान करार करण्यात आले. याच कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी निबे ग्रुपने तयार केलेल्या भारतातील पहिल्या ३०० किलोमीटर रेंजच्या युनिव्हर्सल रॉकेट सिस्टीम “सूर्यास्त्र” याचे लोकार्पण केले. आर्टिलरी शेड प्रोडक्शन लाईनचे उद्घाटन केले. येथून दरवर्षाला पाच लाख आर्टिलरी शेल्सचे म्हणजेच तोफगोळ्यांचे उत्पादन होणार आहे.Shirdi’s defense

    – हे करार असे : 

    – कॉन्ट्रॅक्ट : ब्लॅकस्काय टेक्नोलॉजी इंक.- ऑप्टिकल सॅटेलाइट्ससाठी

    – लेटर ऑफ इंटेंट : डी हॅव्हिलंड एअरक्राफ्ट ऑफ कॅनडा लिमिटेड – सी-प्लेन मॅन्युफॅक्चरिंगसाठी

    – सामंजस्य करार : एल्बिट सिस्टिम्स लिमिटेड – प्रोपेलेंट जे व्ही

    यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, निबे ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर गणेश निबे व इतर मान्यवर उपस्थित होते.

    Make in India buzz in Shirdi’s defense hub; But what kind of production will be there??

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sanjay Shirsat : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग दिला जातोय; संजय शिरसाट यांचा ठाकरे, राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा

    Chhagan Bhujbal : सरकारविरोधात मुद्दा मिळाला की विरोधक फायदा घेतात; ठाकरे बंधूंच्या आंदोलनावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, पोलिसांच्या भूमिकेवरही भाष्य

    Thackeray Brothers : नीट पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; 26 जुलैला विद्यार्थ्यांसोबत मुंबईत भव्य मोर्चा, पालकांनाही मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन