Eknath Shinde : सभागृहात चर्चा कमी, पायऱ्यांवरच शिव्याशाप जास्त; एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर साधला निशाणा
विधान परिषदेत विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी करत जोरदार हल्लाबोल केला. “आम्ही घरात बसणारे ‘फेसबुकवाले’ नसून थेट जनतेत जाणारे ‘फेस टू फेस’ काम करणारे लोक आहोत,” असा सणसणीत टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.