विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली दौऱ्यावर गेले. गेल्या ४८ तासांतील हा त्यांचा दुसरा दौरा आहे. याआधी १४ जुलै रोजी ते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना भेटले होते.Eknath Shinde
उद्धवसेनेच्या सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिल्लीत शिंदेंची ताकद वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळू शकते. राज्यातही त्यांच्या मागणीनुसार एक कॅबिनेट मंत्रिपद दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. शिंदे दिल्लीमध्ये गुरुवार व शुक्रवार दोन दिवस मुक्काम करण्याची शक्यता आहे. ते एनडीएच्या बैठकीलाही उपस्थित राहणार आहेत.Eknath Shinde
- संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया ऑगस्ट 2027 पासून करा लागू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
पेच सोडवण्यासाठी दौरा
सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर आणि बंडूू जाधव यांच्यात स्पर्धा आहे. त्यापैकी कोणत्या दोघांना संधी द्यावी, असा पेच एकनाथ शिंदेंपुढे असल्याने त्यावर तोडग्यासाठी ते पुन्हा दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत.
Eknath Shinde Visits Delhi Twice in 48 Hours to Meet Amit Shah
महत्वाच्या बातम्या
- Ukraine : युक्रेनमध्येच बनणार फ्रान्सची क्रूझ क्षेपणास्त्रे; इंटरसेप्टर आणि ग्लाइड बॉम्बही बनतील; युक्रेनची संरक्षण उत्पादन क्षमता वाढेल
- Kudankulam : भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक; दावा- हॅकर्सनी माहिती डार्क वेबवर टाकली
- संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया ऑगस्ट 2027 पासून करा लागू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
- Igatpuri Tourist : इगतपुरीतील पर्यटक मारहाण प्रकरण; 9 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; 18 तारखेपर्यंत कोठडी