• Download App
    Devendra Fadnavis संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया ऑगस्ट 2017 पासून करा लागू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

    संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया ऑगस्ट 2017 पासून करा लागू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सातत्याने विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत एक बैठक मुंबई येथे घेतली.

    यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक सुरक्षित, पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्यादृष्टीने परीक्षापद्धती सुद्धा पारदर्शीच असली पाहिजे. परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे आणि त्याचे निकाल सुद्धा वेळेत लागले पाहिजेत. पण, सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसर्‍या व्यवस्थेकडे मार्गोत्क्रमण हे तितकेच सुरळीत सुद्धा असले पाहिजे. त्यातून प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी सुद्धा मिळावा.

    त्यामुळे टप्प्या – टप्प्याने या सुधारणा राबवत संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल आणि तोवर विद्यमान प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्याव्यात. त्यानुषंगाने आता पुढील निर्णय एमपीएससीने घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले. एमपीएससीच्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी प्रशंसाही केली.

    Implement the computer-based examination process from August 2017; Chief Minister Devendra Fadnavis’s directives.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Igatpuri Tourist : इगतपुरीतील पर्यटक मारहाण प्रकरण; 9 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; 18 तारखेपर्यंत कोठडी

    FDA Launches : तुकाराम मुंढेंची ग्राहकांसाठी मोठी घोषणा; ‘अन्न असो किंवा औषध, फक्त बोला… तक्रार आपोआप तयार होईल’, FDA चे अत्याधुनिक पोर्टल लाँच

    राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदासाठी धडपडाट; म्हणून तर फडणवीसांना दिल्लीत पाठविण्याचा घालताहेत “घाट”!!