• Download App
    Eknath Shinde जिल्हा परिषद निवडणुकीत मित्र प्रेमापोटी फडणवीसांचा प्रचाराचा त्याग, पण एकनाथ शिंदेंचा प्रचार मात्र जोरात!!

    जिल्हा परिषद निवडणुकीत मित्र प्रेमापोटी फडणवीसांचा प्रचाराचा त्याग, पण एकनाथ शिंदेंचा प्रचार मात्र जोरात!!

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर मित्र प्रेमापोटी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा त्याग केला, पण एकनाथ शिंदे यांच्या मात्र या निवडणुकीतला प्रचार जोरात आला. अजित पवारांच्या एक्झिट नंतर आपण जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात भाग घेणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. देवेंद्र फडणवीस यांच्या बारा जिल्हा निवडणुकांमध्ये 22 सभा होणार होत्या. त्या सगळ्या सभा त्यांनी रद्द केल्या. Eknath Shinde

    पण एकनाथ शिंदे यांनी मात्र जिल्हा परिषद निवडणूक यांचा प्रचार थांबवला नाही. त्यांनी या प्रचारासाठी सर्वत्र संचार केला.

    – एकनाथ चिंध्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात सभा

    कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज रेंदाळ, हेरले आणि तारदळ येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला.

    लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनी महायुतीला भरभरून यश मिळवून दिले. आता येणाऱ्या जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही तोच चमत्कार घडेल, असा ठाम विश्वास याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.

    हेरले या भागाचा सर्वांगीण विकास, लोकाभिमुख योजना, कायदा-सुव्यवस्था आणि संघटन बळकटी याला प्राधान्य देऊन काम करावे असे आवाहन याप्रसंगी शिवसैनिकांना केले. या निवडणुका गावागावातील मूलभूत विकासासाठी निर्णायक ठरणार असल्याचे सांगत शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने काम करावे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.



    रेंदाळ आणि परिसरातील पाणीप्रश्न गंभीर असून येथील अपूर्ण पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही याप्रसंगी दिली. गावातील रस्ते, माने नगर, विजय नगर, रामनगर, उपनगर, कोट, रांगोळी, जंगमवाडी यांसह सर्व भागांतील नागरी सुविधा, गटार योजना आणि इतर विकासकामांसाठी भरघोस निधी देण्यात येईल असेही यावेळी आश्वासीत केले.

    तर तारदळ येथे झालेल्या मेळाव्यात तारदळ-खोतवाडी पाण्यासाठी ५४ कोटी, तारदळ-निमशिरगाव रस्ता दुरुस्तीसाठी नाबार्डच्या माध्यमातून पाच कोटी रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी ६५ लाख रुपये तसेच वाढीव क्षेत्राच्या ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात येईल, असे शिंदे यांनी याप्रसंगी नमूद केले.

    यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार संजय मंडलिक, माजी आमदार सुजित मिणचेकर, आमदार राजेश क्षीरसागर तसेच शिवसेनेचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवार, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Eknath Shinde in ZP elections campaign

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पद्मसिंह पाटलांच्या सत्काराची अफवा; राणा जगजीत सिंहांचे स्पष्टीकरण काय??

    Chaitar Vasava : गुजरात- आप आमदार, पत्नीसह 9 जणांना 7-7 वर्षांची शिक्षा; वन्यकर्मचाऱ्यांशी मारामारी, खंडणीच्या प्रकरणात ₹96000 चा दंडही

    Abhijeet Dipke : CJP चे दीपके म्हणाले- आम्ही अतिरेकी नाही; शिक्षणमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखले; CJP अतिरेक्यांची B टीम – प्रधान