• Download App
    Extension of general transfers शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्याऔना मुदतवाढ; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना मदत वाढ देण्याच्या निर्णयासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेतले.

    – फडणवीस सरकारचे निर्णय असे :

    – मधु दंडवते यांचे नाव

    सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी मार्गी. नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार. (परिवहन विभाग)

    शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ. त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सूधारणेस मान्यता.
    (सामान्य प्रशासन विभाग)

    – देवस्थानला 25 गुंठे जमीन

    डोंबिवलीतील सोनारपाड्यातील पिंपळेश्वर मंदिराला जमीन.
    डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन मिळणार. या जमिनीवरील मंदिर ट्रस्टचा वापर नियमित करण्यास आणि ही जमीन ट्रस्टला नाममात्र दरात देण्यास मान्यता.
    (उद्योग विभाग)

    – जमिनीसाठीचे मुद्रांक शुल्क माफ

    नवीन नागपूर आणि नवीन बाह्य वळण रस्त्यासाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय. मौजे गोदणी आणि मौजे लाडगाव (रीठी) (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथील खाजगी जमीन नवीन नागपूर आणि नवीन बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी वाटाघाटीने थेट खरेदी करावी लागणार. या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफ करण्यास मान्यता. (महसूल व मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग)

    Extension of general transfers and transfers of government employees

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Corporate : नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण:मेमन, कुरेशीचा जामीन नाशिक कोर्टाने फेटाळला

    Dattatray Bharne : पीक विम्यात खोटी माहिती दिल्यास पाच वर्षांची बंदी:31 जुलैपूर्वी पीक विमा उतरवा- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

    उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; २० पैकी किती राहणार हजर आणि किती राहणार गैरहजर??; आकड्याकडे लक्ष!!