Mira Road : मुंबईतील मीरा रोड परिसरात भीषण दुर्घटना; बांधकामाधीन इमारतीवरील महाकाय क्रेन कोसळली; एकाचा मृत्यू, अनेक वाहनांचे नुकसान
मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड पूर्व भागातील ‘जेपी नॉर्थ’ या नामांकित निवासी संकुलात गुरुवारी संध्याकाळी एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक दुर्घटना घडली. संकुलातील एका इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी एक महाकाय क्रेन अचानक थेट रहिवासी भागातील पार्किंग झोनमध्ये कोसळली.