• Download App
    Chandrakant Patil विठ्ठलाला अडचणीत आणू नका; दत्ता भरणेंच्या विधानावर चंद्रकांत पाटलांचा टोला; मंत्रिमंडळ विस्तार, जयंत पाटलांच्या भेटीवरही दिली प्रतिक्रिया

    Chandrakant Patil : विठ्ठलाला अडचणीत आणू नका; दत्ता भरणेंच्या विधानावर चंद्रकांत पाटलांचा टोला; मंत्रिमंडळ विस्तार, जयंत पाटलांच्या भेटीवरही दिली प्रतिक्रिया

    Chandrakant Patil

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : Chandrakant Patil  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, यासाठी आपण पंढरपुरात विठ्ठलाला साकडं घालणार आहोत, असे मोठे विधान नुकतेच राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी केले होते. या विधानाला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अतिशय खोचक शब्दांत उत्तर दिले आहे. “विठ्ठलाला साकडं घालून जर गोष्टी होत असत्या, तर या आधीही खूप झाल्या असत्या. त्यामुळे विठ्ठलाला अशा अडचणीत आणू नका,” असा चिमटा चंद्रकांतदादांनी काढला. सांगलीच्या मिरज येथे शासकीय रुग्णालयातील विविध लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय प्रश्नांवर सविस्तर उत्तरे दिली.Chandrakant Patil

    विठ्ठलाकडे काय मागावे?

    दत्ता भरणेंच्या विधानावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “विठ्ठलाला चांगला पाऊस पडू दे, पिके चांगली येऊ दे आणि रोगराई कमी होऊ दे, असे साकडं घालायचे असते.”Chandrakant Patil



    जयंत पाटील आणि राष्ट्रवादीची भेट

    वारकरी कुटुंबांना आर्थिक मदत

    पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला झालेल्या भीषण अपघातातील पीडित कुटुंबांची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. या अपघातात आता आणखी एका जखमी महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. शासन नियमानुसार प्रत्येक कुटुंबाला सुमारे 10 लाखांची मदत दिली जाईल (अपघात विमा 4 लाख + वारकरी विमा 4 लाख + गोपीनाथ मुंडे विमा 2 लाख). याव्यतिरिक्त, कोल्हापूरमधील एका पीडित कुटुंबातील मुलीला सीए (CA) चे शिक्षण घ्यायचे असल्याने, जोपर्यंत तिचे शिक्षण सुरू राहील तोपर्यंत तिला दरमहा 5000 रुपये स्वतःच्या ऑफिसमधून दिले जातील, अशी मोठी वैयक्तिक मदत त्यांनी जाहीर केली.

    यावेळी प्रशासनावर सतत टीका करणाऱ्या खासदार विशाल पाटील यांनाही त्यांनी संयमाचा सल्ला दिला. “नम्र होऊन साखर खावी, असे अकांडतांडव करून काहीच होत नसते,” असे ते म्हणाले.

    Don’t Drag Vitthal into Politics: Chandrakant Patil’s Dig at Datta Bharane

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Ketan Agarwal : केतन अग्रवाल हत्याकांड; पोलिसांना चकवा देण्यासाठी सिया आणि चेतनने पाहिले जपानी व्हिडिओ! आधी ‘स्लो पॉयझन’ देण्याचा होता कट

    संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया ऑगस्ट 2027 पासून करा लागू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

    Igatpuri Tourist : इगतपुरीतील पर्यटक मारहाण प्रकरण; 9 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; 18 तारखेपर्यंत कोठडी