विशेष प्रतिनिधी
पुणे : Ketan Agarwal देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवे आणि अत्यंत चक्रावून टाकणारे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वडगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती न्यायालयाने दोघांच्या न्यायालयीन कोठडीत आता २९ जुलैपर्यंत वाढ केली आहे.Ketan Agarwal
दरम्यान, पोलिसांच्या तांत्रिक तपासात आरोपींच्या मोबाईल डेटा आणि वेब हिस्ट्रीमधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून, पोलिसांना चकवा देण्यासाठी या दोघांनी चक्क ‘जपानी व्हिडिओ’ पाहिल्याचे उघड झाले आहे.Ketan Agarwal
पोलीस चौकशीत शांत कसे राहायचे? यासाठी पाहिले जपानी व्हिडिओ!
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी केतनची हत्या करण्यापूर्वीच सिया आणि चेतनने बचावासाठी संपूर्ण प्लॅनिंग केले होते. केतनला लोहगडावरून ढकलून देऊन हत्येला अपघाताचे रूप देण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, हा अपघाताचा बनाव उघडकीस आला आणि पोलिसांनी अटक केलीच, तर पुढील चौकशीला कसे सामोरे जायचे, याची पूर्वतयारी त्यांनी केली होती.Ketan Agarwal
- संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया ऑगस्ट 2027 पासून करा लागू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधून डिलीट केलेल्या डेटाच्या रिकव्हरीदरम्यान काही वेब लिंक्स शोधून काढल्या आहेत. आरोपींनी गुन्ह्यापूर्वी तब्बल दोन तास चालणारे जपानी व्हिडिओ पाहिले होते. अत्यंत कसून होणाऱ्या पोलीस चौकशीत स्वतःवर ताबा कसा ठेवायचा, शांत राहून प्रश्नांची दिशाभूल करणारी उत्तरे कशी द्यायची आणि पोलिसांच्या तावडीतून कसे सुटायचे, याचे धडे या जपानी व्हिडिओच्या माध्यमातून दोघांनी गिरवले होते.
पहिला कट होता ‘स्लो पॉयझन’ देण्याचा; पण…
सिया आणि केतन यांचे लग्न ठरल्यापासूनच सियाने प्रियकर चेतनच्या मदतीने केतनचा काटा काढण्याची तयारी सुरू केली होती. केतनला हळूहळू ‘स्लो पॉयझन’ देऊन संपवायचे किंवा त्याला आयुष्यभरासाठी अपंग करायचे, असा पहिला अघोरी कट सियाने रचला होता. तिने तसा प्रयत्नही केला होता, मात्र बाजारातून किंवा इतर मार्गाने वेळेत विष उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचा हा पहिला कट अपयशी ठरला. त्यानंतर त्यांनी लोहगडावरून ढकलून मारण्याचा अत्यंत क्रूर निर्णय घेतला.
राजस्थानातील खातूश्याम मंदिरात छुप्या लग्नाचा संशय
या गुन्ह्याच्या मुळाशी जाण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे एक पथक थेट राजस्थानमधील प्रसिद्ध खातूश्याम मंदिरात दाखल झाले आहे. सिया आणि चेतन यांच्या मोबाईल चॅटिंगच्या विश्लेषणावरून दोघेही एकमेकांशी ‘पती-पत्नी’ प्रमाणे संवाद साधत होते आणि स्वतःला लग्न झालेले समजत होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सिया आणि चेतन त्यांच्या काही मित्र-मैत्रिणींसोबत राजस्थानला फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी या मंदिरात भेट दिली होती. तिथे त्यांनी गुपचूप लग्न केले होते का? याचा शोध घेण्यासाठी पोलीस गेल्या तीन दिवसांपासून खातूश्याम मंदिराचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि इतर पुरावे तपासत आहेत.
Ketan Agarwal Murder: Siya, Chetan Watched Japanese Videos to Evade Police
महत्वाच्या बातम्या
- Ukraine : युक्रेनमध्येच बनणार फ्रान्सची क्रूझ क्षेपणास्त्रे; इंटरसेप्टर आणि ग्लाइड बॉम्बही बनतील; युक्रेनची संरक्षण उत्पादन क्षमता वाढेल
- Kudankulam : भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक; दावा- हॅकर्सनी माहिती डार्क वेबवर टाकली
- संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया ऑगस्ट 2027 पासून करा लागू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
- Igatpuri Tourist : इगतपुरीतील पर्यटक मारहाण प्रकरण; 9 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; 18 तारखेपर्यंत कोठडी