Chandrakant Patil : विठ्ठलाला अडचणीत आणू नका; दत्ता भरणेंच्या विधानावर चंद्रकांत पाटलांचा टोला; मंत्रिमंडळ विस्तार, जयंत पाटलांच्या भेटीवरही दिली प्रतिक्रिया
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, यासाठी आपण पंढरपुरात विठ्ठलाला साकडं घालणार आहोत, असे मोठे विधान नुकतेच राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी केले होते. या विधानाला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अतिशय खोचक शब्दांत उत्तर दिले आहे.