• Download App
    छत्रपतींचे प्राण पणाला लागणे ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब, चंद्रकांत पाटील यांची टीका|Chhatrapati's fasting agitation is a matter of shame for Maharashtra, criticizes Chandrakant Patil

    छत्रपतींचे प्राण पणाला लागणे ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब, चंद्रकांत पाटील यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    पुणे :  राज्य सरकारला सहजपणे यापूर्वीच मान्य करता येण्यासारख्या मागण्यांसाठी छत्रपतींचे प्राण पणाला लागणे ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मराठे युद्धात जिंकले आणि तहात हारले असे होऊ नये, असेही ते म्हणाले.Chhatrapati’s fasting agitation is a matter of shame for Maharashtra, criticizes Chandrakant Patil

    महाविकास आघाडी सरकार किमान या छोट्या आश्वासनांचे पालन करेल आणि छत्रपतींची तसंच मराठा समाजाची पुन्हा फसवणूक करणार नाही अशी आशा आहे,  असे सांगून पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने  हे उपोषण टाळण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही किंवा त्याची ताबडतोब दखलही घेतली नाही.



    अखेरीस छत्रपतींचे प्राण पणाला लागल्यावर या सरकारला जाग आली आणि त्यांनी काही मागण्या मान्य केल्या. बारकाईने विचार केला तर जे काम या सरकारने करायलाच हवं होतं आणि जे त्यांना सहजपणे करता आलं असतं त्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांना प्राण पणाला लावावे लागले. मराठा समाजाचे जे हक्काचं आहे आणि जे सरकारला सहज करता आलं असतं

    त्यासाठीही शाहू महाराजांच्या वंशजाला राज्याच्या राजधानीत प्राण पणाला लावावे लागले हा महाराष्ट्राचा अपमान आहे. सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुण तरुणींना व्यवसायासाठी सवलतीचे कर्ज, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे या मराठा समाजाच्या शिक्षण व रोजगारासाठी भाजपा सरकारने चालू केलेल्या योजना महाविकास आघाडी सरकारने जवळजवळ बंद पाडल्या.

    त्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने आमच्या सरकारने दिलेले मराठा समाजाचे आरक्षण गमावलं. त्यामुळे छत्रपती संभाजी राजे यांनी वारंवार आवाज उठवला व अखेरीस उपोषण केलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खूप मोठ्या आवेशात मागण्या मान्य केल्याचं सांगितलं आहे पण ते मराठा समाजासाठी किमान एवढे तरी करतील आणि समाजाची तसेच छत्रपतींची फसवणूक करणार नाहीत, अशी आपल्याला आशा आहे.

    Chhatrapati’s fasting agitation is a matter of shame for Maharashtra, criticizes Chandrakant Patil

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा