• Download App
    NCP राष्ट्रवादीच्या "एक्सप्लेनेशन मोडचा" आज तिसरा दिवस; कुणी आणि कशाचे दिले स्पष्टीकरण??

    राष्ट्रवादीच्या “एक्सप्लेनेशन मोडचा” आज तिसरा दिवस; कुणी आणि कशाचे दिले स्पष्टीकरण??

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या “एक्सप्लेनेशन मोडचा” आज तिसरा दिवस आला. सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नसल्याचा खुलासा केला.

    – सुनेत्रा पवारांच्या निवडीला आव्हान

    मात्र सुनील तटकरे यांना आज दुसऱ्यांदा स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यांनी पहिले स्पष्टीकरण सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीला आव्हान देणाऱ्या सच्चिदानंद सिंह यांच्या पत्रासंदर्भात दिले होते. सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी झालेली निवड चुकीची असल्याचे पत्र पक्षाला पाठविले होते. त्या पत्रावरून कायदेशीर पेच निर्माण झाला होता. त्या पत्राच्या पाठीशी प्रफुल्ल पटेल असल्याचे बोलले गेले होते पण त्यांनी त्याचा इन्कार करणारे स्पष्टीकरण दिले होते. त्याचबरोबर सुनील तटकरे यांनी सुद्धा सच्चिदानंद सिंह यांना कायदेशीर सल्ला घेऊन नोटीस पाठविण्याचे स्पष्टीकरण दिले होते.

    – सुप्रिया सुळेंचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण

    त्यापाठोपाठ सुप्रिया सुळे यांनी डीलिमिटेशनच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले. दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सत्तेत सहभाग याविषयी बऱ्याच बातम्या आल्यानंतर सुप्रिया सुळे यांना पत्रकार परिषद घेणे भाग पडले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमचे आयुष्य म्हणजे ब्रेकिंग न्यूज नाही, असा दावा करणारे वक्तव्य केले. पण त्यापलीकडे जाऊन काँग्रेसची किंवा भाजपची राष्ट्रवादी काँग्रेसला कुठलीच “ऑफर” येत नाही, असे बोलून दाखविले यातून खरं म्हणजे कुठलाच मोठा पक्ष आपल्याला विचारत नाही, याबद्दल त्यांची खंत व्यक्त झाली, पण त्यांनी खंत हा शब्द वापरला नाही. बाकी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या स्पष्टीकरण पत्रकार परिषदेत बऱ्याच गोष्टींवर उहापोह केला. पण काँग्रेस किंवा भाजपकडून “ऑफर” येत नसल्याची बातमी मात्र मराठी माध्यमांकडून दडपली गेली.

    – तटकरेंच्या बोलण्यातली “राजकीय मेख”

    राष्ट्रवादी काँग्रेस साठी आज तिसरा दिवस सुद्धा एक्सप्लेनेशनचा ठरला. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्याचवेळी तिथे जयंत पाटील सुद्धा होते डीलिमिटेशन विधेयकासंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा तटकरे यांनी केला, पण त्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना न सांगताच मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची बातमी प्रसिद्ध झाली. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ माजली.



    सुनेत्रा पवारांनी सुनील तटकरे यांना जाब विचारल्याची बातमी त्या पाठोपाठ आली. त्यानंतर सुनील तटकरे यांना स्पष्टीकरण देण्यासाठी माध्यमांसमोर यावे लागले. सुनेत्रा पवारांना न सांगता आम्ही कुठलेच राजकीय निर्णय घेत नाही, असा खुलासा सुनील तटकरे यांनी केला. जयंत पाटील यांच्याशी भेट झाली नसल्याचा सुद्धा दावा त्यांनी केला. मात्र आपण मुख्यमंत्र्यांकडे गेलो, तेव्हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे तिथे होते, जयंत पाटलांनी कालच सांगितले होते. त्याबद्दल मात्र सुनील तटकरे काही बोलले नाहीत. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये कुठलीही अस्वस्थता नाही. गैरसमज नाही. अविश्वास नाही. सुनेत्रा पवारांची आमचे चांगले ट्युनिंग आहे. त्यांना आम्ही सगळ्या गोष्टी सांगतो. राजकीय बैठक असतील तर त्याची माहिती सुनेत्रा पवारांना असते, असे सुनील तटकरे म्हणाले. पण आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी विचारून करतो, असे मात्र सुनील तटकरे म्हणाले नाहीत. तशी बातमी कुठे प्रसिद्ध झाली नाही. पण सुनील तटकरे यांच्या आजच्या बोलण्यात बरीच मोठी “राजकीय मेख” दडली होती.

    शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने डीलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा द्यायचा की नाही हा निर्णय सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आहे. पण त्यांच्या पक्षाने त्या विधेयकाला पाठिंबा दिला म्हणजे ते सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाले, असा त्याचा अर्थ होत नाही, असे सुनील तटकरे म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम लागल्याचा खुलासा सुद्धा त्यांनी केला.

    Today marks the third day of the NCP’s “explanation mode.”

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदासाठी धडपडाट; म्हणून तर फडणवीसांना दिल्लीत पाठविण्याचा घालताहेत “घाट”!!

    Aamir Khan : लव्ह जिहादचा ब्रँड अँबेसेडर म्हटल्यावर आमिरचे स्पष्टीकरण; तिन्हीपैकी कोणत्याही पत्नीने धर्म बदलला नाही; मुलगी व बहिणींचे पती हिंदू आहेत

    NEET Paper : CBIचा दावा- लातूरच्या कोचिंग संचालकाने NEETचा पेपर विकत घेतला