• Download App
    Bankra Mosque कोलकत्याच्या सुभाष बाबू आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बांकरा मशिद हलवायचा निर्णय घेताच बंगाल मधल्या माजी मुस्लिम मंत्र्याला आठवल हिंदू - मुस्लिम भाईचारा!!

    कोलकत्याच्या सुभाष बाबू आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बांकरा मशिद हलवायचा निर्णय घेताच बंगाल मधल्या माजी मुस्लिम मंत्र्याला आठवल हिंदू – मुस्लिम भाईचारा!!

    नाशिक : कोलकत्याच्या सुभाष बाबू आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बांकरा मशिद हलवायचा निर्णय घेतात बंगालमधल्या माजी मुस्लिम मंत्र्याला आठवला हिंदू – मुस्लिम भाईचारा!!

    कोलकत्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई पट्टी जवळ 136 वर्षांपूर्वीची गौरीगंज जामा मशीद उर्फ बांकरा मशीद अस्तित्वात होती. ब्रिटिशांनी मुद्दामून मशिदीच्या जवळ डमडम विमानतळाची हवाई पट्टी बांधली होती. स्वातंत्र्यानंतर सुद्धा ती हवाईपट्टी आणि मशिद एकमेकांच्या जवळच राहिल्या. विमानतळाच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येऊन सुद्धा कुठल्याच सरकारने विमानतळापासून मशीद दूर न्यायचा कधी प्रयत्न सुद्धा केला नव्हता.

    https://x.com/ANI/status/2077717747983876258

    – राजवट बदलल्यावर निर्णय

    पण 2026 मध्ये पश्चिम बंगाल मध्ये राजवट बदलली आणि राज्याचे मुख्यमंत्री सुरेंद्र अधिकारी यांनी विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा मानून बांकरा मशिद हवाई पट्टी पासून दूर न्यायचा निर्णय घेतला‌. 11 जुलैपासून तिथला नमाज बंद केला.

    – मुस्लिम माजी मंत्र्यांचे आंदोलन

    त्यानंतर पश्चिम बंगाल मधल्या माजी मुस्लिम मंत्र्याला हिंदू – मुस्लिम भाईचारा आठवला. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकार मधले माजी मंत्री आणि जमीयत उलेमा ए हिंद या संघटनेचे बंगालमधले अध्यक्ष सिदिकुल्ला चौधरी यांनी त्यांच्या अनुयायांसह सगळ्यांच्या हाताच्या दंडाला काळ्या पट्ट्या बांधल्या. त्यांनी पश्चिम बंगाल भर निषेध आंदोलन करायची घोषणा केली. पश्चिम बंगालमध्ये चार कोटी मुसलमान राहतात. आम्ही सगळे हिंदू – मुस्लिम एकत्र राहतो. हिंदू आमचे भाऊ आहेत. आम्ही संघर्ष करून रक्त सांडू, पण बंगाल मधला भाईचारा नष्ट होऊ देणार नाही, असे वक्तव्य सिद्दिकुल्ला चौधरी यांनी केले.

    https://x.com/ANI/status/2077717747983876258

    – तोपर्यंत नव्हता आठवला भाईचारा!!

    चौधरी जोपर्यंत ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये मंत्री होते आणि ममता बॅनर्जींचे सरकार चालत होते, तोपर्यंत त्यांना पश्चिम बंगाल मधला हिंदू – मुस्लिम भाईचारा आठवला नव्हता. त्यावेळी ते फक्त जमीयत उलेमा ए हिंद पक्षाचे बंगाल मधले प्रमुख म्हणून कारभार पाहात होते. त्यावेळी त्यांच्या नजरेसमोर फक्त मुस्लिमांचे हित होते. त्यावेळी त्यांनी कधी “हिंदू – मुस्लिम भाईचारा” असे शब्द वापरून राजकारण केल्याचे आढळले नाही. पण पश्चिम बंगाल मध्ये राजवट बदलली. ममता बॅनर्जींचे मुख्यमंत्रीपद गेले, चौधरींचे मंत्रिपद गेले. त्यापाठोपाठ सुभाष बाबू विमानतळावरील मशिद हटविण्याची प्रक्रियाही सुरू झाली, त्याबरोबर सिद्दिकुल्ला चौधरी यांना पश्चिम बंगाल मधला हिंदू – मुस्लिम भाईचारा अचानक आठवला. बांकरा मशिद हटविण्याच्या निषेधार्थ शांततापूर्ण आंदोलन करायचे सुचले. पश्चिम बंगाल मधले राजवट बदलल्यानंतर एवढाच काय तो फरक पडला!!

    Decision to relocate the Bankra Mosque at Kolkata’s Subhash Babu International Airport.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर दिल्ली हायकोर्टात तातडीची सुनावणी; केंद्र-दिल्ली सरकारकडून उत्तर मागितले

    राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदासाठी धडपडाट; म्हणून तर फडणवीसांना दिल्लीत पाठविण्याचा घालताहेत “घाट”!!

    राष्ट्रवादीच्या “एक्सप्लेनेशन मोडचा” आज तिसरा दिवस; कुणी आणि कशाचे दिले स्पष्टीकरण??