Nitin Gadkari नेहरूंनी इन्व्हेस्टमेंट कुठे केली, ती कशी चुकली??; गडकरींनी पुराव्यांसह टीका केली!!

Nitin Gadkari

विशेष प्रतिनिधी

जालना : Nitin Gadkari एरवी काँग्रेसवाले भारतातली प्रत्येक गोष्ट नेहरू – गांधींनी केल्याचे श्रेय नेहरूंना देतात, त्यामुळे भाजपवाले प्रत्येक चुकीचे खापर नेहरूंवर फोडतात. पण जालन्यातल्या प्रचार सभेत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र पुराव्यांसह नेहरूंवर टीका केली नेहरुंनी सुरुवातीलाच केलेली इन्व्हेस्टमेंट कुठे आणि कशी चुकली??, याविषयी तपशीलवार सांगितले. Nitin Gadkari

नितीन गडकरी म्हणाले :

काँग्रेसने 1947 पासून जी काही धोरण स्वीकारली तेव्हापासून आजपर्यंत खूप नुकसान झाले. पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी स्टील इंडस्ट्री, एअर इंडिया, इंडियन एअरलाईन्स यांसारख्या उद्योगक्षेत्रात सरकारी पैसा गुंतवला. जी काही इन्वेस्टमेंट झाली, ती सर्व त्याचवेळी वाया गेली. पण माझं म्हणणं असं आहे की, त्याचवेळी जर रस्ते बनवण्यासाठी पैसा खर्च झाला असता, शेतकऱ्यांना सिंचनासाठी खर्च झाला असता, शाळा, दवाखाने बांधण्यासाठी खर्च झाला असता तर कदाचित या देशाचे चित्र आज दुसरं दिसलं असतं. Nitin Gadkari

काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. पण कोणाची गरीबी हटली?? शेतकऱ्यांची गरिबी हटली नाही. कामगारांची गरीब हटली नाही. खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षातील नेत्यांची गरीबी हटली. काँग्रेस बदलत गेली. पण काँग्रेस देशाचा विकास करू शकली नाही. मागल्या 10 वर्षांत मोदी सरकारच्या काळात आम्ही जे काम केले, ते काँग्रेस 60 वर्षांत करू शकली नाही. Nitin Gadkari

मी सिंचन खात्याचा मंत्री असताना मी प्राधान्याने सांगू शकतो की,12000 कोटी रुपये मी महाराष्ट्राला दिले. विकासासाठी दिले. आपला शेतकरी केवळ अन्नदाताच नाही, तर ऊर्जादाता झाला पाहिजे आणि इंधनदाता झाला पाहिजे. माणूस कधी जात, धर्म, पंथाने मोठा होत नाही. माणूस आपल्या गुणांनी मोठा होतो. जो करेगी जात की बात उसको खसके मारेंगे लात.

योग्य नेता आणि नीती आली की तुमचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, तुमची गरीबी हटल्याशिवाय राहणार नाही. आज निवडणुकीमध्ये खोटा प्रचार केला की भारतीय जनता पार्टी विजयी झाली, तर बाबासाहेबांचे संविधान बदलणार. मात्र घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही. कोणत्याही पक्षाचा सरकार आला आणि कोणीही पंतप्रधान झाला तर मूलभूत तत्व बदलता येत नाही.


Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल- उद्धव ठाकरेंनी मतांसाठी लाचारी पत्करली, आम्ही हार पत्करू, पण लाचारी नाही


आणीबाणीवर टीका

इंदिरा गांधींनी 1975 मध्ये आणीबाणी आली आणि आणीबाणी यायच्या आधी अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेला तेव्हा त्यांनी आणीबाणी आणली. आणि भारतीय संविधानामध्ये काँग्रेस पार्टीने बाबासाहेबांचे संविधान पूर्ण तोडून मोडून दुरुस्त केलं. ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. ज्यावेळी आणीबाणी लावली त्यावेळी आणि त्याच्या आधी घटनेचा धाज्जीया उडवण्याचं काम तुम्ही केलं. त्यावर आधी राहुल गांधी यांनी उत्तर द्यावं!!

आम्ही संविधान बदलणार नाही. मात्र कोणाला बदलवू सुद्धा देणार नाही. मुसलमानांना सांगितलं की, हे भाजपवाले खूप खतरनाक आहेत. हे निवडून आले तर पाकिस्तानमध्ये पाठवून देईल. पण काँग्रेसने मुसलमानांना काय दिलं??, तर चहाची टपरी, पानपट्टी याच्याशिवाय काही दिलेच नाही. राजकारणामध्ये जात, धर्म कोणता आणि संप्रदाय याचा उपयोग करून लोकांना आपापसात भांडण लावण्याचे काम आम्ही केलं नाही. येणाऱ्या काळात देखील या देशाकरिता समृद्ध आणि संपन्न बनवायचा आहे.

पुढील 5 वर्षांमध्ये जगातली तिसरी अर्थव्यवस्था आपल्याला बनवायची आहे. स्मार्ट सिटी नाहीतर स्मार्ट व्हिलेज सुद्धा आपल्याला बनवायचे आहे. आज भारत सरकारमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीचे इंजिन मागून लागलं तर महाराष्ट्राच्या विकासाची बुलेट ट्रेन आज आहे, त्यापेक्षा तिप्पट वेगाने धावल्याशिवाय राहणार नाही.

Where did Nehru invest, how did it go wrong said Nitin Gadkari

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात