विशेष प्रतिनिधी
मुंबई : पवार साहेबांनी महाराष्ट्राला पहिले महिला धोरण दिले, असे आत्तापर्यंत सांगत फिरलेल्या राष्ट्रवादीच्या दोन महिला नेत्यांमध्ये आज जबरदस्त भांडण जुंपले, ते एका सुनेच्या छळावरून!! Vidya Chavan on daughter-in-law issue – Chitra wagh
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेत पूर्वीच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि सध्याच्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले. काही दिवसांआधी चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर शरद पवार यांच्यासह पक्षातील काही नेते व सामाजिक कार्यकर्त्यांचे व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावरून विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला.
विद्या चव्हाण यांनी त्यांची सून गौरी चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यामधील संवादाची एक ऑडियो क्लिप पत्रकार परिषदेत लावली. यावेळी त्यांनी चित्रा वाघ या माझ्या सुनेला माझ्याविरोधात भडकवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माझ्या सुनेला सर्व मदत करणार असल्याचं देखील त्या म्हणाल्या.
विद्या चव्हाणाचे आरोप काय?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून हे सर्व घडत असल्याचा दावा विद्या चव्हाण यांनी केला. त्या म्हणाल्या की, चित्रा वाघ सूनेचं बोलणं देवेंद्र फडणवीस यांच्याशी करवून देतात. त्यानंतर फडणवीस म्हणातात की, या प्रकरणाची जबाबदारी चित्रा वाघ यांना दिली आहे. चित्रा वाघ तुम्हाला मदत करतील, असा दावा विद्या चव्हाण यांनी केला.
6 महिन्यांपूर्वी मला ही ऑडिओ क्लिप मिळाली. माझ्या कुटुंबाचा राजकारणाशी संबंध नसताना देखील त्यांचा राजकारणासाठी वापर केला. असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला.
चित्रा वाघ यांची शरद पवारांवर टीका
काही दिवसांआधी चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर शरद पवार यांच्यासह पक्षातील काही नेते व सामाजिक कार्यकर्त्यांचे व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. ‘एक छान कार्टून पाहण्यात आले. ज्याने काढले, त्याच्या कल्पकतेला सलाम! महाराष्ट्राचे पक्षीमित्र ! एकाचा वापर संपला की दुसरा पिंजऱ्यातून बाहेर काढतात’ असं कॅप्शन त्यांनी दिले होते. त्यावर चिडून विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले.
चित्रा वाघांचे प्रत्युत्तर
विद्या चव्हाण यांच्या आरोपांना चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले. “मी महाराष्ट्राच्या समोर सांगते, मी तिला मदत केली, असे चित्रा वाघ यांनी कबूल केले. पण त्याचवेळी चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांच्यावर पलटवार केला.
चित्रा वाघ म्हणाल्या :
मार्च २०२० मध्ये एक डॉक्टर माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं एका महिलेला त्रास होत होता. तिथे यांची सून आली होती. तिचे बाबा पण आले होते. त्यांनी सांगितलं त्यांच्या मुलीसोबत काय काय केलं. तिच्यावर गलिच्छ आरोप केला. त्यांना पहिला मुलगा हवा होता. पण मुलगी झाली. नंतर दुसरीपण मुलगी होती. तिची डेथ झाली. डॉक्टरांनी सांगितलं आता तिला मुल होऊ शकत नाही. असं गौरीने सांगितलं. त्याच्यानंतर तिचा छळ सुरु झाला. असं त्या मुलीने आणि तिच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं. कशा पद्धतीने शिवीगाळ होते, मारहाण होते. या बाईच्या धाकट्या मुलाने वहिणीवर हात टाकला. तिचा विनयभंग केला. तिने जेव्हा हे घरी सांगितलं तेव्हा विद्या चव्हाण यांनी म्हटलं घरात या गोष्टी होतात. या गोष्टी बाहेर काढायच्या नाहीत. पोलिसात तक्रार करायला गेले तर पोलिसांनी हाकलून दिलं.
ज्या वेळेला मेडिकल सर्टिफिकेट घेऊन गेले. एफआयआर लिहित असताना मुलीला विद्या चव्हाण यांनी तिला धमकी दिली. हे थांबवलं नाही तर तुझ्या मुलीला आणि तुझ्या जीवाला धोका आहे. या बाईने आपल्या नातवाला आईपासून वेगळं केलं. ही मला शहाणपणा शिकवणार? ती पवार साहेबांकडे देखील गेली होती, पण त्या असाहाय्य मुलीला पवारांकडून काहीही रिस्पॉन्स मिळाला नाही. ती जयंत पाटील यांच्याकडे गेली. त्यांनीही तिला कोणताही रिस्पॉन्स दिला नाही. मुलगी ज्या अवस्थेत आली होती, तिची अवस्था बघवत नव्हती. मुलगी डॉक्टर आहे. सुशिक्षित आहे. तिला बाळकडू पाजायची गरज नाही. हो केलं मी तिला गाईड. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. तुमच्याबद्दल कला मला माहिती आहे. रडून रडून सून बेहाल झाली होती. विद्या चव्हाण हा जर अपराध असेल तर हजार अपराध मी करेल. मी महाराष्ट्राच्या समोर सांगते मी तिला मदत केली.
झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात, हावडाहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेचे 18 डबे रुळावरून घसरले
मुलीला वेगळं केलं, त्याची हाय तुम्हाला लागली’
विद्या चव्हाण तुम्ही सगळ्या केस हारल्या आहेत. ती मुलगी आता तिच्या आईकडे आहे. मी तिला गाईड केलं यात काय चुकलं?? मी पण आई आहे. बाईची व्यथा समजते. मुलीला वेगळं केलं, त्याची हाय तुम्हाला लागली आहे. आज ते लेकरु आईच्या कुशीत आहे. मला त्याचा अभिमान आहे. एखाद्या बाईवर जर अन्याय होत असेल तर त्यांना सहकार्य, मदत मी करत राहणार. पुन्हा माझ्या नादी लागायचं नाही.
पवार साहेब, पुन्हा असे फुसके बॉम्ब आमच्यावर सोडू नका. जे केलं त्याचा अभिमान आहे मला!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App