नाशिक : निमित्त धारावीचे, ठाकरे + काँग्रेसला डिवचायचे??; की 2014 च्या प्रयोगाची चाहूल??, असा सवाल विचारायची वेळ शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन भेटींनी आणली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासाठी या दोन भेटी सरळ साध्या कारणांसाठी असतीलही, पण पवारांचे या भेटींमागचे हेतू तेवढे साफ आणि सरळ आहेत का??, हा कळीचा सवाल आहे. sharad pawar politically trapping eknath shinde
22 जुलै आणि 3 ऑगस्ट अशा शरद पवारांनी सलग दोनदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेतल्यामुळे ठाकरे गटात चिंता असल्याची बातमी मराठी माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली. राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर असताना शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सलग झालेल्या दोन भेटी उद्धव ठाकरे यांच्यासाठी लिटमस टेस्ट असल्याचे विश्लेषण ठाकरे गट करत असल्याचे बातम्यांमध्ये म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी उद्योग समुहाला देण्यास कडाडून विरोध केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, तर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे टेंडर रद्द करण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. विशेष म्हणजे काँग्रेसची देखील काही वेगळी भूमिका नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या मैत्रीवर टीका केली आहे, असे असताना शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातील मैत्रीपूर्व संबंध हा चर्चेचा विषय आहे. त्यामुळे शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत चर्चा झाली का??, याची माहिती ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते घेत आहेत.
शरद पवारांचे दबावाचे राजकारण?
दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला. मराठा आरक्षणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली. ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत का??, याची देखील माहिती ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते घेत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासाठी बैठका सुरू आहेत. त्याचवेळी शरद पवार हे वारंवार एकनाथ शिंदे यांना भेटून दबावाचे राजकारण करत आहे का??, असा देखील सूर राजकीय वर्तुळात उमटला.
शरद पवार यांची साखर पेरणी?
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचे आणखी एक विश्लेषण होत आहे. राज्यात सध्याच्या घडीला कोणत्याही एका पक्षाचे अथवा आघाडीचे सरकार निवडून येणे शक्य नाही. अशा स्थितीत निवडणुकीच्या निकालानंतर वेगळे काही समीकरण आपल्याला अस्तित्वात आणता येऊ शकते का??, त्यासाठी शरद पवारांची साखर पेरणी सुरु आहे का?? अशी चर्चा सुरु आहे. भले शरद पवार हे साखर कारखान्यांचा मुद्दा, दूध उत्पादक संघाचे प्रश्न, मराठा आरक्षण अशा मुद्द्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असली तरी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या बंद दाराआडच्या चर्चांमधून तर संशयाचे मळभ वाढले आहे.
कारण पवारांचे राजकारण एवढे साधे आणि सरळ नाही. एकनाथ शिंदे यांची वाढती ताकद आणि त्यांच्या शिवसेनेची राजकीय अपरिहार्यता पाहून, जर त्यांना डावलून सरकार बनवताच येणार नाही, अशी स्थिती आली तर आपला त्या सरकारमध्ये विशिष्ट वाटा असावा किंवा हस्तक्षेप असावा, असा डाव तर शरद पवार खेळत नसतील ना??, असा दाट संशय राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
– 2014 चा प्रयोग रीपिट??
2014 मध्ये भाजपने पाठिंबा मागितला नसताना शरद पवारांनी परस्पर भाजपच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. राज्याला लगेच मध्यावधी निवडणूका परवडणार नसल्याचे कारण त्यांनी दिले होते. प्रत्यक्षात त्यावेळी शिवसेनेला भाजपपासून तोडण्यासाठी तो आपला डाव असल्याचे नंतर पवारांनी जाहीरपणे सांगितले होते. मग असाच डाव ते एकनाथ शिंदे यांच्यावर टाकून त्यांना भाजपपासून बाजूला काढत आहेत का??, असा सवाल या निमित्ताने तयार झाला आहे. पण हा सवाल तरी तयार झाला असला, तरी एकनाथ शिंदे पवारांच्या डावपेचाला भुलून भाजपपासून वेगळे होतील का?? किंबहूना होऊ शकतील का??, त्यांना ते वैयक्तिक राजकीय भवितव्याच्या दृष्टीने परवडेल का??, पवारांच्या डावपेचांना बळी पडून एकनाथ शिंदे जर असे बाजूला होणार असतील, तर भाजप त्यावेळी हातावर हात धरून गप्प बसेल का??, हे त्यापेक्षाही कळीचे सवाल आहेत. त्यांची उत्तरे पवारांच्या “21 अपेक्षित” मध्ये सापडतीलच याची गॅरेंटी नाही!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more