पवारांच्या मुलाखतीतून इतिहासातल्या चुकांची उजळणी; मोदी + भाजप करताहेत धोरणात्मक भविष्याची पेरणी!!

पवारांच्या मुलाखतीतून इतिहासातल्या चुकांची उजळणी, पण मोदी + भाजप करताहेत धोरणात्मक भविष्याची पेरणी!!, हे काही सहज सुचले म्हणून किंवा भाजपची आरती ओवाळायची म्हणून दिलेले शीर्षक नाही, तर ते वस्तुस्थितीच्या जवळ जाणारेच शीर्षक आहे. Sharad pawar accepts historical blunders, but Modi + Shah + Nadda plans for future political strategic moves

पवारांनी लोकसत्ता कट्टाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या ऐतिहासिक चुकांची उजळणी केली, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अतिवरिष्ठ नेते ज्या मुलाखती देत आहेत, त्या मुलाखतींमधून ते आगामी सरकार नेमके कोणते धोरणात्मक निर्णय घेणार आहे, याची तपशीलवार माहिती देत आहेत. त्यावर विरोधक काय तोड काढणार??, याविषयी मात्र पवार किंवा त्यांच्यासारखे नेते कुठलेच भाष्य करायला तयार नाहीत.

– पंतप्रधान पद कसे हुकले??

आता हेच पहा ना… पवारांनी लोकसत्ता कट्ट्याला दिलेल्या मुलाखतीत 1996 मध्ये आपले पंतप्रधानपद कसे हुकले??, 2004 मध्ये आपण राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याला का मुख्यमंत्री केले नाही??, याचे खुलासे केले. 1997 मध्ये एच. डी. देवेगौडा यांचा पाठिंबा काँग्रेसचे अध्यक्ष सीताराम केसरी यांनी काढून घेतल्यानंतर त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. त्यावेळी पवार संसदीय काँग्रेस पक्षाचे नेते होते. त्यामुळे अर्थातच त्यांचा पंतप्रधान पदावर दावा आणि हक्क होता. तो त्यांनी बजावायला हवा होता, असे मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले होते. मात्र त्या संदर्भात बोलताना पवारांनी आपली अक्षमताच कबूल केली. त्यावेळी काँग्रेसमध्ये यशवंतराव चव्हाण यांना मानणारा एक गट होता आणि इंदिरा गांधींना मानणारा दुसरा गट होता. आपण पंतप्रधान बनवून देशाचे नेतृत्व केले असते, तर ते इंदिरा गांधींना मानणाऱ्या गटाला पटले नसते आणि त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला नसता. आपण ज्या दिवशी पंतप्रधान पदाची शपथ घेतली असती, त्याच दिवशी आपल्याला राजीनामा द्यावा लागला असता, असे पवार म्हणाले. याचा अर्थ पवारांना इंदिरा गांधींना मानणाऱ्या गटावर मात करता आली नसती किंवा त्यांचा पाठिंबा मिळवता आला नसता, याची कबुली खुद्द त्यांनीच दिली आहे.



– राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद का नाही??

त्याचबरोबर 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे 71 आमदार आणि काँग्रेसकडे 69 आमदार असताना राष्ट्रवादीची शक्ती दोन आमदारांनी जास्त असताना राष्ट्रवादीने आपल्या हक्काचे चालून आलेले मुख्यमंत्रीपद घेतले नाही, असा आरोप अजित पवारांनी केला होता. त्या आरोपा संदर्भात खुलासा करताना पवारांनी राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार नव्हता, असा दावा केला. छगन भुजबळ यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला आपण राष्ट्रवादीतून मुख्यमंत्री केले असते, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेव्हाच फुटला असता. त्यामुळे आपण राष्ट्रवादीला ज्यादा मंत्रीपदे घेऊन मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिले, असे पवार म्हणाले.

वास्तविक पवार हे आपल्या राजकीय कौशल्यातून नेतृत्वाच्या अनेक फळ्या तयार करतात, असे त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस मधले नेते बोलत असतात. राष्ट्रवादी अखंड होती तेव्हा देखील राष्ट्रवादीचे समर्थक हेच बोलत होते. मग शरद पवारांना 1999 ते 2004 एवढ्या 5 वर्षांमध्ये अखंड राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्री पदाला साजेसा दुसऱ्या फळीतल्या नेता तयार करता आला नव्हता का??, हा सवाल तयार होतो.

त्याचबरोबर 1992 मध्ये ज्या छगन भुजबळांना शिवसेनेतून फोडून पवारांनी काँग्रेसमध्ये आणले होते, त्या छगन भुजबळ यांना जर पवारांनी मुख्यमंत्री केले असते, तर आपलीच राष्ट्रवादी आपल्याला टिकवता आली नसती याचीच कबुली पवारांनी तर दिली नाही ना??, असा सवाल तयार होतो.

शरद पवार हे गांधी परिवाराला काँग्रेस मधला “सिमेंटिंग फोर्स” आहे असे वारंवार म्हणत आले आहेत. मग स्वतः पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस मधला बळकट “सिमेंटिंग फोर्स” नाहीत का??, असाही सवाल समोर येतो.

पण एकीकडे पवार असे इतिहासातल्या चुकांची उजळणी करत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री, अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नाटक नड्डा हे मात्र वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखती देताना भाजपच्या सरकारचा पुढचा रोड मॅप सांगत आहेत.

2024 मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर समान नागरी कायदा, 1991 चा प्रार्थना स्थळ कायदा, राज्यघटनेतील नागरी कर्तव्ये या विषयांना हात घालणार. काशी आणि मथुरा इथल्या मंदिरांसाठी आंदोलन न करता कायद्याच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न तातडीने सोडवणार, बहुप्रतिक्षित न्यायव्यवस्था सुधारणा आणणार, असे विषय हे नेते उघडपणे सांगत आहेत. मात्र काँग्रेस सह सर्व विरोधकांचा या सर्व विषयांना विरोध असताना प्रत्यक्षात सरकार हे विषय अजेंड्यावर आणताना सगळे विरोधक नेमका कोणत्या प्रकारे या विषयांना विरोध करतील??, त्यांची रणनीती नेमकी काय असेल??, याविषयी मात्र पवारांना मुलाखतीत कोणी प्रश्न विचारले नाहीत किंवा त्यावर त्यांनी भाष्यही केले नाही.

– इतिहासातल्या चुका

गेल्या काही दिवसांमध्ये पवार जाहीर भाषणांमध्ये आणि मुलाखतींमध्ये असेच इतिहासात रमल्याची उदाहरणे आहेत. आपण केंद्रात कृषिमंत्री असताना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना कसे इस्रायलच्या दौऱ्यावर घेऊन गेलो होतो, तिथे त्यांना आपण कशी इजरायलच्या आधुनिक शेतीची माहिती दिली होती, याचे रसभरीत वर्णन पवारांनी जाहीर सभेत केले होते. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या आणि पवार कृषिमंत्री असलेल्या दशकभराचा काळ उलटून गेला आहे. त्यानंतर मोदी दोन टर्म पंतप्रधान राहिले. आता ते तिसऱ्या टर्म मध्ये प्रवेश करण्याची वाट पाहत आहेत, पण पवार मात्र नेमकी आणि विशिष्ट रणनीती आखून आपल्या पक्षाची देशव्यापी राजकीय भविष्याची पेरणी करण्याऐवजी इतिहासातल्या चुकांची उजळणी करत बसले आहेत.

Sharad pawar accepts historical blunders, but Modi + Shah + Nadda plans for future political strategic moves

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात